Wednesday, October 19, 2022

व्यथा मनाची 2

आज खूप रडावसं वाटतंय
डोळे अभाळसारखे भरून आलेत
मनातील वादळ उरफाटून आलंय
नभातील चांदणं नाहीसं झालय
डोळ्यांचे काठ भरधाव पावसाचा संकेत देत आहेत
कोणत्याही क्षणी पाझर फुटेल आणि
डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांचा पूर वाहून येईल....
असं वाटतंय जावं त्या भरधाव घेणाऱ्या पावसात
आणि वाहून टाकावं स्वतःला त्या सागराच्या उसळणाऱ्या
लाटांसारखं.....
कसं समजावू या डोळ्यांच्या पापणीला
ती तर भरल्या नभासारखी भरून आलीय....
आयुष्यात पुन्हा एकदा एकांत घेऊन आलीय....
मनातील वादळ थांबायचं नावच घेत नाहीय...
कसं थांबवायचं या वादळाला या मनाला ही कळत नाहीय...
.............................................................
कुठं रितं करावं या आसवांना....
वहीच्या कोऱ्या कागदावर .....
की कवितेच्या सुंदर ओळींवर....
कुणाच्या मनावर
की स्वतःच्याच नशिबावर....
कुठं तरी दूर निघून गेल्यावर.....
की कुणाच्या निघून गेलेल्या आठवणींवर....
निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर
की कुणाच्या कुशीत निजल्यावर.....
चार चौघांच्या खांद्यावर
की जावून रितं करावं आसवांना त्या रचलेल्या सरणावर...
.......................................
कशी येतात ना लोकं आयुष्यात
आणि काम संपलं की निघून जातात
मायेचा हात डोक्यावर ठेवून....
आपल्याला त्यांची सवय लावून जातात....
आपल्याला जिवापाड प्रेम देऊन
आणि आपल्याच जीवाला घोर लावून जातात.....
...............................................

स्वप्नमयी......


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...