जगताना सुख दुःखाच्या वाटेवर
जीवनाचा हा प्रवास असावा नेहमी
स्वामी तुमच्याच आशिर्वादावर
येतील वादळे येतील तुफान
जगायचंय मला त्या आशेच्या किरणांवर
जीवन प्रवास निष्पन्न व्हावा माझा
फक्त स्वामी तुमच्या चरणांवर
जीवनाच्या प्रवासात नेहमी
सहवास तुझाच असावा
सांभाळून घेईल मी सर्व
फक्त मार्ग तुझाच असावा
येतील संकट खूप जीवनात
त्यांना सामोरं जायचयं मला
फक्त तू माझी रहा
खूप जपून ठेवायचंय तुला
No comments:
Post a Comment