ऋतू गंध मनी दरवळताना
वाऱ्याची मंजुळ गाणी गाताना
सखे याद यावी का तुझी
गीत प्रितीचे गुनगुनतांना
सप्तरंग ते बघताना
सूर तालावर ते छेडताना
सखे याद यावी का तुझी
पाने वाऱ्यावरती डोलतांना
हर्ष मनी माझ्या होताना
मी प्रेम कविता वेचताना
सखे याद यावी का तुझी
हा थंड गारवा झोंबताना
मनी अंग शहारे येताना
डिंपल गालात पडताना
सखे याद यावी का तुझी
सखे तुझ्यात मी रमताना
तू हृदयी जवळी असताना
नजरेत तुझ्या मी बघताना
सखे स्वप्ने मी ग बघतो तुझी....
No comments:
Post a Comment