भूतकाळातील भावनाना
जपून ठेवलंय मी
दर्दभऱ्या वेदनांना
खूप अवघड होता तो
भूतकाळातील प्रवास
तरीही गोड वाटत होता तो
कारण तुझा होता सहवास
भूतकाळातील साऱ्या आठवणी
पुस्तकात कैद झाल्या
वेदनांनी भरलेल्या आठवणी
मनातच राहून गेल्या
भूतकाळातील प्रवास
किती खडतर होता
साथ होती तुझी तरीही
काटेरी झुडूपाप्रमाणे होता
No comments:
Post a Comment