*🙏माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.*
*🤞लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.*
*👍काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.*
*🤞जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.*
*🙏त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं.. बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.*
*🤞संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.*
*माणूस म्हणाला कां? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं राव 😅तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी 😊🤝 कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.*
*👍लक्ष्यात ठेवा......*
*☝️भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं. ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...*
*🤞लेख माझा नाही पण छान आहे. कारण एवढच की सर्वांपर्यंत चांगले विचार पोहोचवायचे.*
श्री स्वामी समर्थ....
🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment