Saturday, October 8, 2022

आई.... बाबा

आई.... गळ्यातील तुळशीची माळ
तर बाबा त्यातील गुंफलेला दोरा

आई.... घरातील मातीची चूल 
तर बाबा चुल्हीत जळणारं लाकुड

आई.... घरातील चुलीवरची भाकर
तर बाबा भाकरीला शेकणारा तवा

आई.... देव्हाऱ्यात जळणारी वात
तर बाबा वातीला सावरणारा दिवा

आई.... लेकराची छाया
तर बाबा न दिसणारी माया


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी