आणि त्यात आहेत आपण सर्व
नम्रता आहे त्यांच्या बोलण्यात
कोणत्याच गोष्टींचं नाही त्यांना गर्व....
कधी खूप राग तर
कधी असते ओठांवर स्मित हास्य त्यांच्या
कधी हळवं मन तर कधी
डोळ्यात असते प्रेमळ माया त्यांच्या....
स्वतः वरचा विश्वास
अदृढ आहे त्यांचा.....
अशक्यालही शक्य करेल
हाच ध्यास आहे त्यांचा.....
प्राजक्ताचं फुलही बहरून येईल
नभातील आभाळ ही वाहून जाईल....
असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं की,
सोसाट्याच्या वारा ही स्तब्ध होऊन जाईल...
वाटलं मनाला माझ्या
याच व्यक्तिमत्वावर कधी
लेखणी माझी चालवावी
आज ती वेळ चालून आली
आयुष्यात माझ्या
ती ओळ कोऱ्या कागदावर मी उतरावी
अन् कवितेला माझ्या हळुवार पालवी फुटावी....
अन् कवितेला माझ्या हळुवार पालवी फुटावी....
No comments:
Post a Comment