झाला सर्व घोळ
केला तो काळजावर वार
चंद्रमुखीने
घालुनी नथनी नाकात
धडधड झाली काळजात
पडलो मी मोहात
चंद्रमुखीच्या
ओठांवर लाली
कानात बाली
नजर ती खिळली
चंद्रमुखीवर
नेसूनी येवला पैठणी
साज शृंगार लेवूनी
झाली मृगनयनी
ती चंद्रमुखी
घातले पैजण पायात
डौलात आली तोऱ्यात
छमछम घुंगरू वाजत
ती चंद्रमुखी
No comments:
Post a Comment