स्वप्नांच्या दुनियेत तू मज घेऊन जावे
सत्य आहे की स्वप्न मज न कळावे
कोवळे मन माझे वाऱ्यावर झुलावे
निसर्गाची निरव शांततेने स्पर्श करावा
तो स्पर्श ही मज तुझा भासावा
मंद वाऱ्याची झुळूक
अन् खळखळनारं पाणी
सुंदर असं दृश्य डोळ्यात मी साठवावं
ते निर्मळ दृश्य बघता मी त्यात पूर्ण गुंतून जावं
तू खूप जवळ यावं.... असच मला वाटावं
No comments:
Post a Comment