गळ्यातला सुर जैसा ओठातून ओघळवा
दवबिंदूचा सळा चौफेर पसरावा
आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
सायंकाळ झाली असता
पक्षांचा किलबिलाट व्हावा
रिमझिम पावसाने त्याचा प्रहार करावा
परखूनी पर्जन्यपारा सुगंध हा मातीस यावा
भिजल्या फुलातून जैसा.... दवबिंदू तो ओळखावा
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
No comments:
Post a Comment