Monday, October 3, 2022

बापूजींची साधी राहणी

गांधीजी बॅरिस्टर झाले. आणि आफ्रिकेत गेले.आफ्रिकेत गेल्यावर त्यांनी पाहिले की होते लोकं काळ्या लोकांवर अन्याय करत आहेत. त्यांनी काळ्या लोकांना संघटित केले. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केला. 

गांधीजी बॅरिस्टर असल्यामुळे त्यांचे राहणीमान चांगले होते.ते नेहमी सुट बुट ह्या वेशात असत. आफिकेतून नंते ते भारतात आले. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले होते . त्यांनी गांधीजींना संपूर्ण भारत देशात भ्रमण करण्यास सांगितले आणि देशाची सामाजिक परिस्थिती समजून घेण्यास सांगितले. गांधीजी भारतात खेड्यापाड्यातून फिरले. तेव्हा त्यांनी बघितले की लोकांची इतकी वाईट परिस्थिती आहे, की त्यांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे पण नाही . लोकं अर्ध्या कपड्यात राहतात. म्हणुन त्यांनी पंचा वापरायला सुरुवात केली. कितीही मोठ्या व्यक्तीला भेटायला जायचे असेल तरीही ते पंचाच नेसून जात. अगदी इंग्लंडला झालेल्या परिषदेला ही गांधीजी पंचा नेसूनच गेले होते. 

गांधीजी पंचाचा पूर्ण वापर करत असत. पंचा फाटल्यावर त्याचा उपयोग अंग पुसण्यासाठी टॉवेल म्हणून ते करीत असत. तो टॉवेल ही खराब झाला की रुमाल म्हणून वापरत असत. आणि सर्वात शेवटी त्याचा ते कागद बनवायला वापर करत.
गांधीजी पाण्याचा वापरही आवश्यक तेवढाच करत असत.
टॉलस्टॉय तसेच अन टू द लास्ट हे पुस्तक लिहिणारे रस्किन इत्यादी विचारवंतांचा गांधीजींवर प्रभाव होता.टॉलस्टॉय यांनी लिहिलेली खालील गोष्ट फार बोलकी आहे.
एक माणूस असतो. त्याला सांगितले जाते की, सुरू उगवल्यापासून मावळेपर्यंत तो जेवढा धावेल व मूळ जागी परत आला तर तेवढी त्याच्या मालकीची जमीन होईल. तो धावायला सुरुवात करतो. धावताना त्याला दमायला होते. तरी तो आराम करण्यासाठी, जेवणासाठी तसेच पाणी पिण्यासाठी ही थांबत नव्हता. अजून जमीन मिळण्याच्या हव्यासापोटी तो सतत धावत होता. सूर्यास्त व्हायला आला तरीही तो धावत राहिला. अखेर मूळ जागी परत जाण्यासाठी वळला तोपर्यंत त्याच्या अंगातले त्राण संपले. तो जमिनीवर पडला आणि नंतर तो कधीही उठू शकला नाही जमिनीच्या हव्यासापोटी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. 
या लेखातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की आपण बहुतेक जण अधिक भौतिक सुखाच्या मागे लागलो आहे . या तथाकथित सुखासाठी पर्यावरणाचा नाश होत आहे. तो आता थांबवायला हवा.

तात्पर्य - वस्तूंचा पूर्ण वापर करावा आणि सध्या व पर्यावरण स्नेही राहणीमानाचा स्वीकार करावा...


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...