Monday, October 31, 2022

भावना मनाच्या

शब्द काळजातले
ओळी प्रेमाच्या
क्षणात तुटल्या त्या
भावना मनाच्या

गात मंजुळ गाणी
अन् कविता प्रेमाच्या
क्षणात वहिल्या त्या
भावना मनाच्या

गीत रानातले अन्
तारा स्वरांच्या
क्षणात विरघळल्या त्या
भावना मनाच्या

अंधुक झाल्या
वाटा प्रेमाच्या
विरहात गेल्या त्या 
भावना मनाच्या


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी