Monday, October 31, 2022

सत्य परिस्थिती

गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी? 

नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?

नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

😩😩😩😩😩😩😩  
गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?

नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?

नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?

नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी (फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय !  तुमच्या जमीनीवरुन रेल्वे जातआहे रेल्वेमध्ये गेलेल्या जमिनींच्या नोटीसा आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण तुझी सही साठी यायला जमेल काय तुला ?  तुझा दादा पण यायला निघालाय?

नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तर चालेल का सगळे येऊत! दादाला सांगा दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्या बाबांना विचारा घरी येऊ का ?  डायरेक्ट तहसील ऑफिसला येऊ. वाटल्यास मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?  पुर्ण काम झाल्यावरच परत जाईल..
      😭😄😂😱😇
     ❓❓❓❓❓

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही आजची सत्य परिस्थिती आहे.'

लोकांमध्ये  Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया 🙏


कोणाला आवडले नसेल तरी हरकत नाही कोणी like करणार नाही तरी हरकत नाही पण सत्य परिस्थिती आहे ही आजची 🙏🙏🙏🙏

copied


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...