Monday, October 31, 2022

Diwali

पहिला सारखी सर आते दिवाई ले येस नही,
मामानं गाव कायशे, आते याद कोणले येस नही !!१!!

मोबाईल ना जमानामा पोरे भलता रमी ग्यात,
नातं गोतं काय शे भाऊ, ते सुद्धा इसरी ग्यात !!२!!

मामानं गावले जावाना आमले भलता नांद ऱ्हाये,
खिसामा दमडी नही आन, चड्डीले आमनं ठिगय ऱ्हाये!!३!!

काय सांगू त्या सुरत भुसावल रेल्वे ना दिन,
एक रुप्यानी पुडी साठे, मायले मारणी पडे पिन !!४!!

आते दिवाईनी फराय ना लाडू नही गोड,
आते म्हणस का दादा कोणी, चाल माले ठेसन ले सोड !!५!!

मायाबहीनिसले सासरवास व्हता म्हणून माहेरना तिसले व्हडा व्हता,
दिवाइले परतानी वखत, मायबाप ना भलता लळा व्हता !!६!!

दिवाई करी परताना टाइम ये डोयान्या धारी लागेत,
तवय खावाले नही व्हत भाऊ त्या दोन चार शंकरपाया भी भलता आमले भारी लागेत !! ७!!

आमले दिवाई ना कपडासनी भलती मोठी आस ऱ्हाये,
त्या पैसासवर एक महिना घर भागी जाई, हाई मायले आस ऱ्हाये !!८!!

काय त्या दिन माय माऊली ना कपाशी येचाना हाल ऱ्हाये,
सुट्टी कव लागी आणि कपाशी कव उलगी 
हाई आमना मन मा मोठी चाल ऱ्हाये!!९!!

जमाना बदली ग्या, मानस भी बदली गयात,
ना ऱ्हाईनी ती दिवाई, ना त्या मानसं हयात !!१०!!


copied....


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...