Monday, October 31, 2022

वी. स. खांडेकर

*वि. स. खांडेकर*
माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात, मग तेजाळणा-या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते. दिवे जळून विझले की त्यांची असहाय्यता समजते. ते का विझले असावेत? याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते. आपण जेव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तसं पाहिले तर प्रत्येक दिव्याला विझावचं लागतं. कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी पण. दिवे जेव्हा प्रकाशमान असतात तेव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो. आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी अंधाराएवढी सुरक्षित जागा कोणतीही नाही. अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून *विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल.*


copied


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...