Sunday, January 30, 2022

प्रशंसापत्र


शब्दमंच आयोजित उपक्रम - 4
Thank you शब्दमंच टिम🙏🙏🥰

प्रशंसापत्र - 3



प्रशंसापत्र आयोजित उपक्रम - 3
शब्दमैफिल स्पर्धा....

Friday, January 28, 2022

लोग बदल जाते है





ये तो पता था की मौसम बदल जाते हैं
ये भी पता था की वक्त भी बदल जाते हैं
लेकीन ये दोनो ने ही समझाया की 
यार वक्त और मौसम दोनों बदल जाने पर 
लोग भी बदल जाते हैं....

स्वप्नमयी....✍🏻✍🏻✍🏻

छोड जाते हैं लोग



वक्त के साथ साथ जैसे लोग बदलते चले जाते हैं....
तब समझमे आता है की लोग बदलते बदलते हमें भी छोडते चले जाते हैं....


स्वप्नमयी....✍🏻✍🏻✍🏻


इन्सानियत को मार दिया



वक्त के साथ साथ खुद को भी बदल दिया तुने....
चंद पैसो के लिये अपने भाई को ही छोड दिया तुने....
माना की इस दुनिया मे पैसो से ही काम चालता है  
लेकीन...........
उसके साथ इन्सानियत को ही मार दिया तुने......


स्वप्नमयी....✍🏻✍🏻✍🏻

Thursday, January 27, 2022

you....

काहीवेळा शांतता ही 
काही बोलू इच्छिते
फक्त ते ऐकण्यासाठी 
स्वतःच्या मनालशी 
तितकंच शांत ठेवावं लागते.....

you....

Tuesday, January 25, 2022

शायरी खूशी




शब्दमंच आयोजित उपक्रम - 4
दिनांक -25/1/2022
विषय - खूशी ( शायरी )
स्पर्धेसाठी

आज का दीन बुरा गया तो क्या हुआ
कल का दीन अच्छा आएगा....
जिंदगी खुशी से जी लो यारो
वक्त ही तो हैं.... 
एक दीन बदल ही जाएगा.....

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻

आनंद

शब्दमंच आयोजित उपक्रम - 4
दिनांक - 25/1/2022
विषय - आनंद   ( चारोळी)
स्पर्धेसाठी

तुझ्या अबोल डोळ्यांना बघून 
गुलाब कळ्यांनी लाजावं....
स्म्रूतिंच्या कोंदणात साठवुन
मनचक्षुनीही आनंदित व्हावं.....

स्वप्नमयी......✍🏻✍🏻✍🏻

Sunday, January 23, 2022

प्रशंसापत्र - 3



प्रशंसापत्र आयोजित उपक्रम - 3
शब्दमैफिल स्पर्धा....

Saturday, January 22, 2022

तुटलेला विश्वास.... अलक कथा


अलक कथा....

तुटलेला विश्वास हा तुटलेल्या आरशासारखा असतो जो कधिही दुरुस्त करता येत नाही. तसचं काहीस दीपिकाच्या आयुष्यात झालं . तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. अगदी जीवापाड. तसं तर ही पण त्याच्यावर खुप प्रेम करत होती. पण अचानक तिच्याकडून कधीतरी एक चूक झालेली होती. ती चूक तिने त्याच्यापासून लपवलेली होती. त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.एक दिवस असा आला की, तिची ती चूक त्याला माहित पडली आणि त्याचा तिच्यावरच विश्वास उडाला.तो कधीही परत आणता येणार नाही. पण तिला त्या गोष्टीचा खूप पश्र्चाताप होता. पण त्याचा काही फायदा नव्हता. कारण आता ती वेळ निघून गेली होती. 

स्वप्नकवी...✍🏻✍🏻


Wednesday, January 19, 2022

वेळ निघून गेल्यावर.... अलक कथा


शब्दमंच आयोजित उपक्रम -3
दिनांक -20/1/2022
वार - गुरुवार
विषय - वेळ निघून गेल्यावर
अलक कथा


अचानक त्याने तिला सांगितले की, मी एका मुलीवर प्रेम करतो आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत.हे ऐकून तिला धक्काच बसला. तो सोन्यासारखा संसार मागे सारून आणि चार वर्षाच्या चिमुरडीला सोडून काहीच विचार न करता तो निघून गेला. नंतर ती आपल्या छोट्याशा चार वर्षांच्या मुलीचे मायबाप होण्याचे कर्तव्य पार पाडत होती. आता ती त्याच्याशिवाय जगायलाही शिकली. 
    त्याने ज्या मुलींसाठी स्वतःच्या बायकोला सोडले तिच आता एका मुलासोबत पैशासाठी पळून गेली.हे त्या जेव्हा समजले तेव्हा तो पुन्हा त्याच्या घरी म्हणजेच त्याच्या बायको जवळ आला. पण आता वेळ निघून गेलेली होती.तिने त्याच्यासाठी घराचे दरवाजे कधीचेच बंद केले होते आणि मनाचेही.

स्वप्नमयी....✍🏻✍🏻

Monday, January 17, 2022

प्रशंसापत्र


शब्दमंच आयोजित साप्ताहिक उपक्रम - 2

वेळ...



आपसूकच सरकत असते ती वेळ
मग निर्माण होतात नवीन आशा
ठरतात आपसूकच नियोजनाच्या दिशा

वेळ तर कधीच थांबत नाही....
ती वाहत असते निर्मळ प्रवाहासारखी....
सळसळणाऱ्या बेधुंद वाऱ्यासारखी....

नाते जन्मलेले जुळवत असते
अन् हळूहळू संपत असते...
पण वेळेचं वाहणं मात्र सुरूच असते...
आशेच्या थेंबाला आठवणीत झुलत असते...

कधी घडवून आणते 
नशिबी ध्येयाचा तो ध्यास
तर कधी शोधत राहतो 
अखंड, अविरत श्वास....

ती हसत असते आणि पुढे पुढे जात असते
पण माणसाच्या आयुष्याचा खेळ मात्र 
तिच्या उघड्या डोळ्यांनी बघत असते....
ती वेळ.....
ती कुणाचं साठी थांबत नाही....
थांबायचं असते माणसाला....
माहीत नाही ती काय आहे...पण 
अलगद स्मित करत असते
त्या स्वयंघोषित सुर्यांना....

पण डोळे मात्र तिचे साक्षीदार आहेत...
ती होती...ती आहे....आणि ती राहील...
तिच्यासोबत सर्व नाती जुळतील आणि तुटतील
पण वेळ मात्र पुढे पुढे सरकत राहील....

स्वप्नमयी....✍🏻✍🏻

Sunday, January 16, 2022

गुलाबी थंडी


हायकू...

गुलाबी थंडीने
अंग हे शहारते
काहूर माजते...

स्वप्नमयी....✍🏻✍🏻


आशेचे किरण




आशेचे किरण

जशी पक्षांना उडण्यासाठी 
साथ हवी अस पंखांची
तशीच माणसाला झेप घेण्यासाठी 
साथ हवी असते आशेची....

माणूस जगतो तो 
आशेच्या किरणावर
बेधुंद होऊन उडतो 
स्वप्नांच्या जोरावर

स्वप्नमयी....✍🏻✍🏻✍🏻

शिवाजी महाराज




महाराजांचे ध्येय 
स्वराज्य जिंकायचे
कर्तव्य निभवायचे
स्वराज्यात...

ध्येय शिवबाचे 
उरी त्यांच्या पेटले
स्वराज्य उभारले
महाराष्ट्रात


स्वप्नकवी.....✍🏻✍🏻✍🏻✍🏻

Friday, January 14, 2022

मकर संक्रांत special....


तिळाच्या संगतीला गुळाचा गोडवा... 
2. रावांच नाव घेते....वाट माझी सोडवा..... 

3. गूळ भरल्या पोळीला  
4. आज तिळाची संगत.... 
5. रावांच नाव घेते आज 
6. मकर संक्रात.... 

7. गुळाची पोळी आणि तिळाचा लाडू 
8. रावांच नाव घेते....गोड बोलणं नका सोडू.... 

9. मकर संक्रांत.... 
10. पैठणी साडी आणि अबोलीचा गजरा.... 
11. रावांच नाव घेते...आज माझ्यावर सर्वांच्या नजरा... 

12. गोड गोड गुळाला.... 
13. तिळाचा मार.... 
14. रावांनी आणला मला 
15. हिऱ्यांचा हार... 

16. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला 
17. हीच सर्वांना सदिच्छा.... 
18. रावांच नाव घेते सर्वांना  
19. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..       

20. 14 जानेवारीला येतो  
21. सण मकर संक्रांतीचा.... 
22. आज संकल्प घेऊया 
23. सर्वांशी गोड बोलण्याचा .... 

स्वप्नकवी....✍🏻✍🏻✍🏻


Thursday, January 13, 2022

उसका स्टेटस....



आज बहुत दिनो बाद उसका स्टेटस देखा मैने...🙂🙂


तो देखीये स्टेटस कुछ इस तरह था......
.
.
.
.
खुद को मेरे दिल में छोड गये हो....... तुम्हे
                                        .........❤️
.
.
ये स्टेटस देखकर
पता नहीं आज मुझे कुछ अजिबसा लग रहा है...
मानो कोई अपना दूर गया था 
वो बहुत करिब आ रहा है....
ऐसा लाग रहा है.....की 
उसने ये word मेरे लिये ही लिखा हैं.....
जिस पल की कबसे तलाश थी 
वो पल मेरे नजदीक आ रहा है...
इस चेहरे पे कबसे खामोशी छाई हुई थी
अब उसपर एक मुस्कान सी कली खिल रही है
मानो उसने ये word मेरे लिए ही लिखा हैं....
लेकीन......😟
लेकीन.... लेकीन क्या....
लेकीन वो स्टेटस किसी और के लिये हुवा तो....
तो क्या...
नहीं पता.....
लेकीन बहुत बेचैन लाग रहा है.....


स्वप्नमयी .......✍🏻✍🏻

Wednesday, January 12, 2022

भाव भावना.... हायकू...


शब्दमंच आयोजित उपक्रम - 2
दिनांक - 12/1/2022
वार - बुधवार
काव्यप्रकार - हायकू
शीर्षक --- भावना

भावले मला 
ते शब्द अंतरीचे
माझ्या मनीचे

शोधिले तुला
मन अंतरी माझे
प्रतिबिंब तुझे

ठाव मनाचा
गुंता हा भावनांचा 
वेड्यापरीस

ठाव भावनांचा 
मज कळू लागला
उरी दाटला

*स्वप्नमयी.....✍🏻✍🏻


विरहात....


शब्दमंच आयोजित उपक्रम
प्रकार -- काव्यांजली*
शिर्षक -- - विरह...

रात्र सरली
वेळ ही थांबली
निशब्द झाली 
विरहात

आभाळ भरले
नभ ही दाटले
डोळे मिटले
विरहात

एकटी पडले
मनी उधाण सुटले
जीव गुदमरला 
विरहात

भातुकलीचा खेळ
झाला सर्व मेळ
आठवणी जमल्या 
विरहात

*स्वप्नमयी....*✍🏻✍🏻


आईसाहेब जिजाऊ....


राजमाता जिजाऊ तुमची 
पुन्हा एकदा गरज आहे...
स्वराज्याच्या सुखासाठी 
तुम्हा शिवबा घडवायचा आहे

रयतेच्या कल्याणाचा आई 
एकदा तू विचार करून जा....
स्वराज्याच्या सुखासाठी
तू शिवबा एकदा घडवून जा.....

माय लेकी पोरक्या झाल्या
आई तुझा फाटला पदर....
पाठच्या बहिणीची ग 
इथ नाही कुणाला कदर....

स्वराज्याच्या रक्षणासाठी
आई तलवार तू एकदा देऊन जा
रयतेच्या कल्याणासाठी
तू शिवबा एकदा घडवून जा....

आई तुझ्या विचारांवर 
घडविला तू छत्रपती राजा....
पण तरी सुखी नाही 
तुझ्या स्वराज्यातील प्रजा....

स्वराज्याच्या रक्षणासाठी
आई तू पुन्हा एकदा येऊन जा...
प्रजेच्या सुरक्षिततेसाठी
तू शिवबा एकदा घडवून जा....

आईसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा....💐💐🪴🌱  
स्वप्नकवी....✍🏻✍🏻✍🏻🪴🌱 



Saturday, January 8, 2022

जीवनातील चढउतार.....


बरेच घाव सोसलेत तर
अजून घाव सोसायचे....
आलेच आहोत इथवर
तर पुढे का थांबायचे.....
क्षणभंगुर असते दुःख
कशाला त्यास घाबरायचे.....
नव्हतेच कधी ते आपले
त्यास काय रोज रोज रडायचे.....
पाहिलेल्या स्वप्नांना
मनातील भावनांना
किती काळ मनात ठेवायचे....
येतील अनेक वादळे आयुष्यात
मग आपले स्वप्न त्यास मोडायचे....
बरेच कावे दावे करतील आपल्याविरुद्ध
मग काय आपण मागे हटायचे....
परिस्थिती समोर झुकणे खूप झाले आता....
जरी आली वादळे आयुष्यात
आता तरी नाही डगमगायचे....
खुप झाले किनाऱ्यावर तरणे
आता डोहात उतरायचे....
आयुष्याच्या प्रवासात
अनेक येतील चढ उतार
ते चालायचेच.....
उसंत घेण्यास आता
वेळ राहिला नाही....
खूप काळ गेला विचारांच्या वादळात....
आता फक्त ध्येय गाठायचेच.....

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻📚


माणूस....



माणूस तिथे माणूस राहत नाही....
जिथे त्यात माणुसकी राहत नाही....
अरे तुला जन्म तर मिळाला माणसाचा
पण माणूस तू अजून झालाच नाही....
स्वतःच पोट तू भरलास पण
दुसऱ्यांची भूक तुला दिसलीच नाही...
दगडातील देव तर तू शोधलास पण
माणसात देव तू कधी पहिलाच नाही...
अरे माणसा तुझी ओंजळ तर तू भरलीस
पण दुसऱ्याची ओंजळ तू खाली केलीस
ते तर तुला दिसलीच नाही....
अरे माणसा माणूस तू कधी झालाच नाही...

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻


Friday, January 7, 2022

संसार....

नदारीचा संसार 
माझ्या मायन केला
फाटकी लुगडी नेसून
संसार पुरा केला

अंधारल्या झोपडीत
चूलीत लाकडं पेटली
बाप झाला दिवा
माय वात होऊन जळली

काळजाच्या गाभाऱ्यात
रोजचं तिच्या अंधार
ऊन येते डोईवर
तरी कष्ट करते अपार

जिद्द असते तिच्या ऊरी
उन्हातान्हात राबते
बापासंगे माझी माय
भाकर कष्टाचीच खाते

इवल्याशा झोपडीत
माय थाटते संसार
राब राबून मातीत
होते बापाचा आधार

तिचं फाटक नशीब
काळ्या मातीत फुलते
नांगराच्या फाडावर
तिचं नशिब झूलते

बाप आहे विठूराया
माय माझी रखुमाई
संसारी जळते जळते
माय होऊन समई.....

दुःख लिहिलं तिच्या भाळी
तरी संसार हसून करते
फाटक्या झोपडीत 
माय सुखानं नांदते.....

स्वप्नमयी....✍🏻✍🏻🌊🌱🪴


शब्द....अभंग

शब्दचि माझे प्राण
शब्दचि माझे ज्ञान
आयुष्य प्रदान शब्दचि
शब्दचि माझे वित्त ||
शब्दच हरवी चित्त
भान ही विसरे शब्दचि ||
शब्दचि देती सुख
 शब्दचि करीति दुःख
धोये अंतकरण शब्दचि ||
स्वप्नकवी...✍🏻✍🏻🌊🌱🪴

Wednesday, January 5, 2022

सिंधुताई सपकाळ.....परत ये ना माई



अनाथांचा आधार माई तू 
भुकेल्यांची भाकर माई तू....
गोरगरिबांची चाकर माई तू
संघर्षातून विश्व उभारले माई तू
पद्मश्री पुरस्कार मिळवले ठाई ठाई तू
स्वतःच्या पोटाची खडगी करून 
तुझ्या पिल्लांची भूक भागवली माई तू.....
पण आता तुझी पिल्ल उपाशी आहेत 
त्यांची आई बनुनी ये माई तू....
तुझ्या पिल्लांना सोडुन 
कशी ग गेलीस माई तू
परत ये ना माई तू.....
परत ये ना माई तू.....
पुन्हा एकदा जन्म घेऊनी 
तुझे सार्थक दाखव ना माई तू.... 
तहानलेल्यांची तहान हो ना माई तू
पून्हा एकदा परत ये ना माई तू
पून्हा एकदा परत ये ना माई तू....😢😢

भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐

स्वप्नकवी.....✍🏻🌊🌱अनाथांचा आधार माई तू 
भुकेल्यांची भाकर माई तू....
गोरगरिबांची चाकर माई तू
संघर्षातून विश्व उभारले माई तू
पद्मश्री पुरस्कार मिळवले ठाई ठाई तू
स्वतःच्या पोटाची खडगी करून 
तुझ्या पिल्लांची भूक भागवली माई तू.....
पण आता तुझी पिल्ल उपाशी आहेत 
त्यांची आई बनुनी ये माई तू....
तुझ्या पिल्लांना सोडुन 
कशी ग गेलीस माई तू
परत ये ना माई तू.....
परत ये ना माई तू.....
पुन्हा एकदा जन्म घेऊनी 
तुझे सार्थक दाखव ना माई तू.... 
तहानलेल्यांची तहान हो ना माई तू
पून्हा एकदा परत ये ना माई तू
पून्हा एकदा परत ये ना माई तू....😢😢



भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐

स्वप्नकवी.....✍🏻🌊🌱

Monday, January 3, 2022

झेप


ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची
स्वप्न उराशी घेऊन झेप पुन्हा नव्याने घेण्याची....
स्वप्नांना पंख देऊन ही वाट आहे वळणाची
पाखरू होऊन पुन्हा उडण्याची....
ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची
उमेद तुझी आत्मविश्वास तुझा
हीच वेळ आहे पंखांना बळ देण्याची
पायी रुतला जरी काटा
तरी ही वेळ नाही खचण्याची
ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची

स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌱📚🌊






Saturday, January 1, 2022

प्रेम

प्रेम असावं त्या निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं
प्रेम असावं ते बेधुंद सुटलेल्या वाऱ्यासारख
प्रेम असावं ते किलबिल करणाऱ्या पक्षांसारख
प्रेम असावं ते आकाशातील चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखं
प्रेम असावं ते बेधुंद होऊन उडणाऱ्या पाखरासारख
प्रेम असाव त्या काट्यांमधे राहून सर्वदूर सुगंध दरवळणाऱ्या  फुलासारखं.....
प्रेम असावं ते मोगऱ्याच्या वेलीलाही सुगंध देण्यासारखं
प्रेम असावं ते श्रावणातल्या रिमझिम पडणाऱ्या पावसासारखं....
प्रेम निस्वार्थ असावं..... गवतावरच्या दवबिंदुला हळूवार छेडण्यासारखं....

स्वप्नकवी.....✍🏻✍🏻🌱📚🌊

आज जिंदगी को जिंदगी से मिलते देखा मेने


आज वह सुबह सूबह जल्दी उठी
शायद उसे इस सुबह का बरसो सें इंतजार था...
उसकी आखें शांत नही थे जैसे इधर उधर नजरे
भाग रही हो और इंतजार कर रही हो की कोई ठहराव लाए...
आज उसकी मुस्कान भी कुछ अलग ही थी
जैसे होठ आपस मे लढाई कर रहे हो...
वो भी इस बात पर की कोई नजर भर चेहरा
देखे तो वजह का अंदाज ना लगा दे....
आज उसको बहूत सुकुन में देखा मैने
वो भी उसके चंचल मन के साथ
उसका हर लफ्ज नाच रहा हो कुछ तरंगो के साथ
बहुत बैचेन सी नजर आ रही थी मुझे वो
तभी मन में खयाल आया की
पूछू उससे की क्या है वजह
फिर ख्याल आपा की मेरा सवाल
उसे और बैचेन ना कर दे
उसको सजते सावरतें देखा नही कभी
लेकीन आज वह खुदको ऐसे निहार रही है जैसे
नजर भर से ही खुदको सवार रही है....
अपने हाथ को बार बार स्पर्श कर रही है...
मानो एहसास को मुठ्ठी मे कैद कर रही है....
जाते देखा उसको अपने सपनें के पास
उसके कदम जमीं पर तो थे लेकीन
उसका मन शितल हवा मे उड्डान भर रहा था
धड़कने उसकी हवा मे गित गा रही थी.....
इतना खूश तो मैने उस कलीं को होते देखा है....
जो सुरज की किरणें पाने से खुदको
मुक्कमल कर लेती है.....
लगता है वह अपनें सपनों के बहूत करीब है....
उसकी सांसे इतनी तेज है कीं
अगर उसका स्पर्श नहीं मिला तो शरीर से
दम निकल जाए औंर रुह इतनी तेज रोशनी में
गुम हो जाए की अपनी ही रुह पेहचान मे ना आए....


अब इस अनुभव कों कैंसे जाहीर करू.....

आज जिंदगी को जिंदगी से मिलते देखा मैने....🌊🥰

स्वप्नकवी.....✍🏻✍🏻🌱🌊📚


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...