ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची
स्वप्न उराशी घेऊन झेप पुन्हा नव्याने घेण्याची....
स्वप्नांना पंख देऊन ही वाट आहे वळणाची
पाखरू होऊन पुन्हा उडण्याची....
ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची
उमेद तुझी आत्मविश्वास तुझा
हीच वेळ आहे पंखांना बळ देण्याची
पायी रुतला जरी काटा
तरी ही वेळ नाही खचण्याची
ही वाट आहे पुन्हा नव्याने जगण्याची
स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌱📚🌊
No comments:
Post a Comment