प्रेम असावं ते बेधुंद सुटलेल्या वाऱ्यासारख
प्रेम असावं ते किलबिल करणाऱ्या पक्षांसारख
प्रेम असावं ते आकाशातील चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखं
प्रेम असावं ते बेधुंद होऊन उडणाऱ्या पाखरासारख
प्रेम असाव त्या काट्यांमधे राहून सर्वदूर सुगंध दरवळणाऱ्या फुलासारखं.....
प्रेम असावं ते मोगऱ्याच्या वेलीलाही सुगंध देण्यासारखं
प्रेम असावं ते श्रावणातल्या रिमझिम पडणाऱ्या पावसासारखं....
प्रेम निस्वार्थ असावं..... गवतावरच्या दवबिंदुला हळूवार छेडण्यासारखं....
स्वप्नकवी.....✍🏻✍🏻🌱📚🌊
No comments:
Post a Comment