Wednesday, January 19, 2022

वेळ निघून गेल्यावर.... अलक कथा


शब्दमंच आयोजित उपक्रम -3
दिनांक -20/1/2022
वार - गुरुवार
विषय - वेळ निघून गेल्यावर
अलक कथा


अचानक त्याने तिला सांगितले की, मी एका मुलीवर प्रेम करतो आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत.हे ऐकून तिला धक्काच बसला. तो सोन्यासारखा संसार मागे सारून आणि चार वर्षाच्या चिमुरडीला सोडून काहीच विचार न करता तो निघून गेला. नंतर ती आपल्या छोट्याशा चार वर्षांच्या मुलीचे मायबाप होण्याचे कर्तव्य पार पाडत होती. आता ती त्याच्याशिवाय जगायलाही शिकली. 
    त्याने ज्या मुलींसाठी स्वतःच्या बायकोला सोडले तिच आता एका मुलासोबत पैशासाठी पळून गेली.हे त्या जेव्हा समजले तेव्हा तो पुन्हा त्याच्या घरी म्हणजेच त्याच्या बायको जवळ आला. पण आता वेळ निघून गेलेली होती.तिने त्याच्यासाठी घराचे दरवाजे कधीचेच बंद केले होते आणि मनाचेही.

स्वप्नमयी....✍🏻✍🏻

No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...