आपसूकच सरकत असते ती वेळ
मग निर्माण होतात नवीन आशा
ठरतात आपसूकच नियोजनाच्या दिशा
वेळ तर कधीच थांबत नाही....
ती वाहत असते निर्मळ प्रवाहासारखी....
सळसळणाऱ्या बेधुंद वाऱ्यासारखी....
नाते जन्मलेले जुळवत असते
अन् हळूहळू संपत असते...
पण वेळेचं वाहणं मात्र सुरूच असते...
आशेच्या थेंबाला आठवणीत झुलत असते...
कधी घडवून आणते
नशिबी ध्येयाचा तो ध्यास
तर कधी शोधत राहतो
अखंड, अविरत श्वास....
ती हसत असते आणि पुढे पुढे जात असते
पण माणसाच्या आयुष्याचा खेळ मात्र
तिच्या उघड्या डोळ्यांनी बघत असते....
ती वेळ.....
ती कुणाचं साठी थांबत नाही....
थांबायचं असते माणसाला....
माहीत नाही ती काय आहे...पण
अलगद स्मित करत असते
त्या स्वयंघोषित सुर्यांना....
पण डोळे मात्र तिचे साक्षीदार आहेत...
ती होती...ती आहे....आणि ती राहील...
तिच्यासोबत सर्व नाती जुळतील आणि तुटतील
पण वेळ मात्र पुढे पुढे सरकत राहील....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment