Wednesday, January 12, 2022

विरहात....


शब्दमंच आयोजित उपक्रम
प्रकार -- काव्यांजली*
शिर्षक -- - विरह...

रात्र सरली
वेळ ही थांबली
निशब्द झाली 
विरहात

आभाळ भरले
नभ ही दाटले
डोळे मिटले
विरहात

एकटी पडले
मनी उधाण सुटले
जीव गुदमरला 
विरहात

भातुकलीचा खेळ
झाला सर्व मेळ
आठवणी जमल्या 
विरहात

*स्वप्नमयी....*✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी