राजमाता जिजाऊ तुमची
पुन्हा एकदा गरज आहे...
स्वराज्याच्या सुखासाठी
तुम्हा शिवबा घडवायचा आहे
रयतेच्या कल्याणाचा आई
एकदा तू विचार करून जा....
स्वराज्याच्या सुखासाठी
तू शिवबा एकदा घडवून जा.....
माय लेकी पोरक्या झाल्या
आई तुझा फाटला पदर....
पाठच्या बहिणीची ग
इथ नाही कुणाला कदर....
स्वराज्याच्या रक्षणासाठी
आई तलवार तू एकदा देऊन जा
रयतेच्या कल्याणासाठी
तू शिवबा एकदा घडवून जा....
आई तुझ्या विचारांवर
घडविला तू छत्रपती राजा....
पण तरी सुखी नाही
तुझ्या स्वराज्यातील प्रजा....
स्वराज्याच्या रक्षणासाठी
आई तू पुन्हा एकदा येऊन जा...
प्रजेच्या सुरक्षिततेसाठी
तू शिवबा एकदा घडवून जा....
आईसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा....💐💐🪴🌱
स्वप्नकवी....✍🏻✍🏻✍🏻🪴🌱
No comments:
Post a Comment