बरेच घाव सोसलेत तर
अजून घाव सोसायचे....
आलेच आहोत इथवर
तर पुढे का थांबायचे.....
क्षणभंगुर असते दुःख
कशाला त्यास घाबरायचे.....
नव्हतेच कधी ते आपले
त्यास काय रोज रोज रडायचे.....
पाहिलेल्या स्वप्नांना
मनातील भावनांना
किती काळ मनात ठेवायचे....
येतील अनेक वादळे आयुष्यात
मग आपले स्वप्न त्यास मोडायचे....
बरेच कावे दावे करतील आपल्याविरुद्ध
मग काय आपण मागे हटायचे....
परिस्थिती समोर झुकणे खूप झाले आता....
जरी आली वादळे आयुष्यात
आता तरी नाही डगमगायचे....
खुप झाले किनाऱ्यावर तरणे
आता डोहात उतरायचे....
आयुष्याच्या प्रवासात
अनेक येतील चढ उतार
ते चालायचेच.....
उसंत घेण्यास आता
वेळ राहिला नाही....
खूप काळ गेला विचारांच्या वादळात....
आता फक्त ध्येय गाठायचेच.....
स्वप्नमयी.....✍🏻✍🏻📚
No comments:
Post a Comment