Saturday, January 8, 2022

माणूस....



माणूस तिथे माणूस राहत नाही....
जिथे त्यात माणुसकी राहत नाही....
अरे तुला जन्म तर मिळाला माणसाचा
पण माणूस तू अजून झालाच नाही....
स्वतःच पोट तू भरलास पण
दुसऱ्यांची भूक तुला दिसलीच नाही...
दगडातील देव तर तू शोधलास पण
माणसात देव तू कधी पहिलाच नाही...
अरे माणसा तुझी ओंजळ तर तू भरलीस
पण दुसऱ्याची ओंजळ तू खाली केलीस
ते तर तुला दिसलीच नाही....
अरे माणसा माणूस तू कधी झालाच नाही...

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...