माझ्या मायन केला
फाटकी लुगडी नेसून
संसार पुरा केला
अंधारल्या झोपडीत
चूलीत लाकडं पेटली
बाप झाला दिवा
माय वात होऊन जळली
काळजाच्या गाभाऱ्यात
रोजचं तिच्या अंधार
ऊन येते डोईवर
तरी कष्ट करते अपार
जिद्द असते तिच्या ऊरी
उन्हातान्हात राबते
बापासंगे माझी माय
भाकर कष्टाचीच खाते
इवल्याशा झोपडीत
माय थाटते संसार
राब राबून मातीत
होते बापाचा आधार
तिचं फाटक नशीब
काळ्या मातीत फुलते
नांगराच्या फाडावर
तिचं नशिब झूलते
बाप आहे विठूराया
माय माझी रखुमाई
संसारी जळते जळते
माय होऊन समई.....
दुःख लिहिलं तिच्या भाळी
तरी संसार हसून करते
फाटक्या झोपडीत
माय सुखानं नांदते.....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻🌊🌱🪴
No comments:
Post a Comment