Thursday, September 30, 2021

My feelings....

 बहुत खुश नसिब होगी वो शक्स

जिसके नसिब में तु होगा

लेकीन एक बात बोलू तुझे

तू लाख कोशिश कर ले

मुझसे दर जाने की..... लेकीन

तुझे मेरे जैसा हम सफर काही नहीं मिलेगा......


Sapna patil.....✍📝


Tuesday, September 28, 2021

Feelings

 जी व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलून 

पण तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न 

करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला

आयुष्यात कधीच गमावू नका....

.         कारण ती तुमच्यावर खरं प्रेम करते.... 

          I write my feelings....

          Sapna patil....✍

अफसोस

बहुत हसीन होगी वो लडकी 

जिसके हाथ में तेरा हाथ होगा....

लेकीन ये भी सच हैं जनाब...

की हमारे जैसा साथ नहीं होगा....

यही जिंदगी भर अफसोस होगा...

Sapna patil....✍


एहसास

 आप बोलते हो की हमारे ना होने से 

आपको कोई फरक नहि पडता.... 

हमें खोने से आपको दर्द नहीं होता.... 

माना की हमने  बहुत गलतिया की हैं...

लेकीन आपने भी तो हमे 

एक बार माफ कर दिया होता....

हमें पता है आप सिर्फ बोल रहे हो की 

आपको दर्द नहीं होता है हमारे ना होने से.....

आपका दर्द सिर्फ हम ही जान सकते हैं.....

इसका प्रूफ हैं हम आपके होने से.....

Sapna patil....📝....✍


आपने तो छोड दिया हमें 

रात का सपना समझकर....

हमने क्या गुन्हा किया था 

जो आपने ठुकरा दिया हमें  

आपका कल समझकर.....

Sapna patil...✍...📝

Monday, September 20, 2021

अंधश्रद्धेत फसले....

गेले होते मंदिरात काहीतरी मागायला

श्रद्धेच्या नावाखाली दगडाची पूजा करायला

अंधश्रद्धेत मी वाहून देवाच्या 

मी तर दगडावर दूध ही वाहिले 

पण त्याच्याच दारातील भिकाऱ्याला 

मी तडपतांना पाहिले

खूप दान केले मी स्वतः उपाशी राहून 

चिमुकल्या जीवाला पण उपाशी मारले

 पण दान केलेल्या पैशाचेही 

काहिच फायदे नाही जाहले...

जेवढे होते जमा केलेले 

तेवढे मी दानपेटीत टाकले

वाढले फक्त पोट पुजाऱ्याचे

आम्ही भक्त तर मात्र तसेच राहिले....

Sapna patil ✍️...📝


Friday, September 17, 2021

आयुष्य हरले मी

सागरातून मोती काढावे तसं 
काहीतरी आयुष्य जगले मी
आयुष्य जगता जगता पूर्णच हरले मी....
तसं आयुष्य तर सुंदरच जगले मी....
पण नशिबाला माझं सुंदर जगणं 
मान्य नव्हतं कदाचित...
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी...
शेवटी नशिबाने लिहिलेल्या ओळीच ना त्या....
त्यांना पुसायच धाडस तरी कसं करू मी....
जिंकले असते मी आयुष्य....
पण शेवटी नशीबच ना ते....
असह्य एकटेपणाच त्याने 
माझ्या कपाळी लिहिलेला कदाचित.....
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी....
तसं आयुष्य तर शेवटपर्यंत 
हसतच जगणार होते मी....
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना
मागे सारून टाकणार होते मी.....
पण शेवटी नशीबच ना ते....
नशिबाची लेखणी कधीच
चुकवू शकत नव्हते मी...
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी.....

Sapna patil ✍️📝

Thursday, September 16, 2021

विरह....

 

रात्र ही सरून गेली विरहात तुझ्या

एकटीच राहून गेली आयुष्यात माझ्या

शब्द अंतरीचे माझे निशब्द होऊन गेले

उलटून रात्र गेली विरहात तुझ्या

वेळ ही सरता सरून गेली 

आठवण तुझी मात्र कायम राहून गेली

निशब्द होऊन मी माझ्या

मुक्या ओठांनी बंदिस्त राहून गेली

रात्र ही सरता सरून गेली

एकटीच होते एकटीच आहे

आणि एकटीच राहिले

विरहात तुझ्या आयुष्य सारे सरून गेले


Sapna patil ✍️📝



Wednesday, September 15, 2021

जाणीव वेळेची.....



कालचे पाच मिनिट संपले नाही आहेत....तर

आजचे दहा मिनिट संपतील कधी....

कालच्या पाच मिनिटांची  वाट बघता बघता एक रात्र उलटून गेली....

पाच मिनिटांची वेळ मात्र मध्येच थांबून गेली....

पहाट झाली....दिवस उगवला....पण 

पाच मिनिटांची वेळ मात्र मध्येच पूर्ण रात्रच गाठून गेली...

सकाळची दुपार झाली कालच्या पाच मिनिटांची आठवण मला आली .....म्हा्

म्हटलं विसरून जाऊ कालच्या पाच मिनिटाला....

तर कालच्या पाच मिनिटाला विसरून नवीन वेळेला सुरुवात मी केली.....

पुन्हा तेच.....आता तर सुरुवात दहा मिनिटांवर आली...

..........

खरच कालच्या पाच मिनिटांनी आणि आजच्या दहा मिनिटांनी मला वेळेची जाणिव मात्र करून दिली....

😊

Sapna patil....✍📝.....

एकवटले आज मी....

 निद्रेत जागून मी फक्त एकटक पाहत होते....

डोळ्यात दाटून भावना....फक्त मलाच बघत होते....

दाटून कंठ माझा श्वास मी घेत होते....

आयुष्याचा खेळ हा मी न समजताच खेळत होते ...

मनातील स्वप्न माझे आज मी पुसत होते....

डोळ्यात दाटून भावना मी फक्त मलाच बघत होते....

आयुष्यातील माझ्या सारे त्यांच्या विश्वात व्यस्त होते.....

माझ्या आयुष्याचा खेळ मात्र 

त्यांच्या उघड्या डोळ्यांनी बघत होते.....

कुणीच नव्हते माझे कुणी न राहिले आता....

मांडून भातुकलीचा खेळ माझा

ते सारे मलाच हिणवत होते.....

भरलेल्या विचारांनी डोळे माझे पणावत होते .....

निद्रेत जागून मी....मलाच एकटक पाहत होते.....

Sapna patil ✍️📝


वाट ती वळणाची.....

शोधून सर्व वाटा तरी वाट ती मला सापडली नाही...
मांडणी अशी ही आयुष्याची कधीच मला ती समजली नाही ....
अजूनही चुकत आहेत निर्णय माझे....
वाट ती वळणाची कधीच मला उमगली नाही....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही...
दुःखाची दोरी होती बांधलेली पायाशी माझ्या....
सुखाची वाट मला कधी दिसलीच नाही....
दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करून 
दुःख आणले आयुष्यात मी माझ्या.....
पण स्वतःच्या सुखासाठी तर मी कधी झटलेच नाही....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही.....
सोसून दुःख सारे आयुष्य संपले माझे....
नक्की कोणात सुख होते माझे 
हे मी कधी समजलेच नाही.....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही....
Sapna patil ✍️📝


 Bअशी ही आsयुष्याजूची कधीच मला समजली नाही...एवानडणी 

ती वेळ परत यावी

ती वेळ परत यावी 
आपल्या मैत्रीची....
भीती कशाची नसून
खेळलेल्या बाळगलेल्या क्षणांची .....
ती वेळ परत यावी
आपल्या बालपणीची....
भीती कशाची नसून
बिनधास्त जगण्याची ....
ती वेळ परत यावी
आपण एकमेकांना फटकळ पणे
बोलण्याची....
आपण न रागवता 
एकमेकांना समजून घेण्याची....
भीती कशाची नसून 
बिनधास्त बोलण्याची...
ती वेळ परत यावी
आपल्या मिलनाची.....
भीती कशाची नसून
आसुसलेल्या क्षणांची.....

Sapna patil ✍️📝....

शोध स्वतःचा....

आज तो स्वतःला शोधण्यात हरवला होता ....
आयुष्याचे निर्णय घेण्यात तो थोडासा गुंतून गेला होता...
नक्की तो स्वतःला शोधतो कुणात आहे हेच त्याला कळत नव्हते...
पण त्याच्या आयुष्याचे निर्णय काहीतरी चुकीचे वाटत होते....
मग मी ही त्याला सांगितले....स्वतःला शोधण्यास निघालाच आहेस....तर तू स्वतःला तिथे शोध जिथे....
भिकेल्यांची भूक तू आहे.....
तहानलेल्या  ची तहान तू आहे.....
गरिबांचा वाली खरच तूच आहेस.....
अन्नाच्या एका कणा साठी ते आपला श्वास सुद्धा विकत आहेत.....
त्यांच्या त्या श्वासात तूच आहेस....
आणि त्यांच्या त्याच  भरकटलेल्या जीवात फक्त तुझाच वास आहे....
इथंच तू स्वतःला शोध.....
कारण हीच तुझ्या खऱ्या आयुष्याची परीक्षा आहे....

Sapna patil ✍️📝.....

तुझं जाणं

तुझं असं अचानक जाणं....

मनाला घोर लावून गेलं....

नव्हता असला विचार पण केला मी

की तू असा अचानक निघून जाशील...

पण तुझं असं अचानक जाण...

खूप त्रास देवून गेलं....

तुझ्या नसण्याने आयुष्य 

थांबलेलं नाहीय माझं...

पण तू नसल्याची उणीव 

कुणीच पूर्ण करू शकत नाही...

तुझं असं अचानक जाण...... खरचं 

आयुष्य जगणं शिकवून गेलं....

Sapna patil ✍️📝


आर्त हाक..... request....

 स्त्रीभ्रूणहत्या.....

बघ ना ग ते गुलाबाचं फुल तुझं रुसणं पाहून ते पण कोमेजून गेलयं....

हसत होतं बिचारं चार दिवसा पासून पण न जाणे कशात गुंतून बसलाय....

हसत होती ती नुसती तिच्या विचाराने...तिच्या चाहुलीने.....

 पण न जाणे कुणी हिरावून घेतलं ग तिला त्या फुलापासून 

कशी गेली ती तिला एका क्षणात सोडून....

रहायचं नव्हत तर कशाला आलीस ग तिच्या आयुष्यात...

Sorry ग....😔 

काटा रुतला असेल का ग तिला....

कधीपासून नकोशी होती ती तिला....

 पण जेव्हा ती तिच्या आयुष्यात आली...

ते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता....

किती वेदना झाल्या होत्या तिला त्या चार दिवसात....

तरीपण ती त्या वेदना हसत सहन करत होती....

तिला त्या वेदना खूप सुख देत होत्या.....

 पण काही क्षणातच तिच्यावर काळाने वार केला....

आणि तिलाच बनवणारा तिचाच शत्रू झाला....

तिला माझ्यापासून कसा ग हिरावून गेला...

आणि आता तिची ती ओली पापणी पाहून ते पण स्वतःला हरवून बसलाय....

Plzzz सांग ना ग तिला.... पुन्हा एकदा तिची कळी व्हायला....

Please Save the child....

लेक वाचवा.....लेक शिकवा....

Sapna patil ✍️📝

जातेय दूर निघून.....

तुला जातेय सोडून दूर निघून 
 परत कधीही न येण्यासाठी.... 
पण हे मन माझे नेहमी 
तुझ्याच जवळ घुटमळत राहील..... 
स्वप्न पाहिले होते तुझे मी 
पण सत्यात माझ्या तू नाही.... 
माझ्या हृदयात तुझी एक हळवी जागा राहील.... 
एक हट्ट होता तुला मिळवण्याचा 
तुझ्यासोबत असण्याचा..... 
तुझ्यासोबत जगण्याचा.... 
पण तो अपूर्ण राहत आहे.... 
सोबत आहे म्हणता म्हणता 
दूर मी निघून जात आहे.... 
भेटशील का रे एकदा 
गुंज तुझ्या मनातले कळवण्यासाठी..... 
एक क्षण पुन्हा प्रेमाचा मनभरून जगण्यासाठी...... 
माहीत नाही मला मी उद्या असेन की नसेन 
पण जिथे पण असेन तिथं फक्त तुझी म्हणून जगत असेन... 

sapna patil ✍️📝

Thursday, September 9, 2021

शब्दात कसे सांगू....

एवढे प्रेम करते तुझ्यावर की शब्दात कसे मांडू तेच कळत नाही मांडले मी आपले प्रेम शब्दात तर त्या शब्दांना अर्थ काही सुचेना तू पाहिलe माझ्या डोळ्यात तुला तर कळल्या तुला माझ्या भावना पण भावनांना शब्दात मांडायचे होते मांडण्यासाठी शब्दच काही सुचेना खरच प्रेम आहे तुझ की नुसता भासावतोया मला हेच कळेना पुन्हा पुन्हा मला त्याचं प्रश्नावर आणून ठेवतोय हेच मला समजेना त्याला शब्दात कसे मांडू तेच मला कळेना sapna patil....✍

किनारा....

मन थकल सार 
क्लेश वाटत आहे 
या नशिबाचा 
 सैरभैर झाले मन माझे 
ना कुणी या जीवाला सहारा 
कधी मिळेल माझ्या या मनाला 
 सागर लाटे सम किनारा 
भरलेले हात असूनही 
ओंजळ वाटत आहे खाली 
सगळे काही असूनही 
 मी अशी ही एकटी 
कधी मिळेल माझ्या या ओंजलीला 
 सागर लाटे सम किनारा 
गुंतले आहे अशा वादळात 
त्यातून निघणे खूप अवघड झाले आहे 
कशी सावरू मी एकटी या जीवाला 
सांग ना देशील का तू या जीवाला सहारा 
कधी मिळेल का या डगमगत्या नोकेला 
सागर लाटे सम किनारा...
sapna patil ✍️

येशील ना....

माझा शेवटचा श्वास हा तुझ्यासाठी आहे 
तू त्या श्वासाला भेटायला येशील ना 
मला एकदा तूझ्या कुशीत झोपून 
 माझे डोळे मितायचे आहेत 
सांग ना मला शेवटचं एकदा 
 तुझ्या कुशीत मला घेशील ना 
 तुझ्या प्रेमासाठी आयुष्भर थांबेल मी
पण तेच प्रेम देण्यासाठी शेवटचं एकदा येशील ना 
मला माहित आहे तू माझं आयुष्य नाही आहेस
तरी पण मी तुला माझं आयुष्य मानते
म्हणून आयुष्यभर नको पण 
शेवटचा एकदा तू माझा होशील ना 
sapna patil ✍️

अपेक्षा....

नेहमी हीच अपेक्षा ठेवते 
की तू येशील परत 
पण जेव्हा भानावर येऊन कळते 
की तू येणार नाही परत 
तेव्हा समजूत घालते मी स्वतःची 
समजावते मी स्वताला 
की तो येणार नाही परत 
तरी मन मात्र वाट बघते 
त्याच्या येण्याची 
नेहमी हीच अपेक्षा असते 
की तू देशील एक दिवस 
माझ्या प्रश्नाचं उत्तर 
 की तो का गेलाय मला सोडून 
खूप वाट बघतेय त्याच्या उत्तराची 
भानावर येवून समजूत घालते स्वतःची 
 की तो मलाच नाही तर हे जगच सोडून गेलाय 
नको अपेक्षा ठेऊ तू त्याच्या येण्याची 

sapna patil ✍️...📝

एकटी.....

तुझ्या शिवाय एकटी आहे रे मी 
 तू असा दूर जाऊ नकोस 
जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर 
 मला अस एकटीला सोडू नकोस 
श्वास आहेस तू माझा 
तू नसला स माझ्या आयुष्यात 
तर हा श्वास पण थांबेल 
please तू त्याला थांबू देऊ नकोस 
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे रे 
तुझ्या स्पर्शाने नाही तर 
तुझ्या मनाने तुला मला पूर्ण करायचंय 
प्लीज तुझ्या मनाला थांबू देऊ नकोस 
आता तुला मला नेहमी हसताना बघायचय
म्हणून मला तुझ्या आयुष्यातून 
कायमच निघून जायचयं....

 sapna patil ✍️

मनातलं गुपित...

मनातल गुपित सांगायचं होत तुला 
पण तू ओळखू shakshil की नाही 
हे पाहायचं होत मला 
ठरवलं होत की मनातल गुपित 
सांगून टाकावं तुला पण 
तू माझ्याबद्दल काय विचार करशील 
हेच वाटत होत मला 
एक दिवस माझ्या मनातलं गुपित 
सांगून दिलं तुला की 
तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे मला 
 हे ऐकुन काही सुचेना तुला पण 
काही वेळानंतर बोललास 
तू हवी आहेस मला तेव्हा 
खूप छान वाटल होत माझ्या मनाला 
असच आपल्यात प्रेम राहो 
 हीच अपेक्षा होती देवाला पण 
न जाणे हे मान्य नव्हते त्याला 
काही क्षणात वेगळं केलं त्याने आपल्याला 
अस ही तो देव कधी झालाच नाही मला 
कारण तो नाहीच तर मला होईल तरी कशाला....🤷
 sapna patil ✍️

शब्दावाचून कळले सारे

सगळ काही डोळे सांगतात तुझे 
असं मला म्हणायचा तू 
शब्दावाचून कळते तुला सारे 
खूप smart आहेस तू 
 अंतर आपल्यात असायचे 
 तर सारं काही डोळेच सांगायचे 
ना तुझे शब्द ना तुझा कधी स्पर्श 
तरीपण मी तुला माझ्या खूप जवळ भासायचे 
ती शांत असलेली संध्याकाळ 
 तो मनाला स्पर्षणारा वारा 
तुझ्या हातात माझा हात 
 किती छान वाटायचे 
पण आपले रस्ते आहेत वेगळे 
एकच मनात असायचे 
 कधी अचानक समोर आलास 
 तर कळतील ना रे तुला 
भाव सारे माझ्या डोळ्यातले 
आता कधीच नाही बोलणार हे ओठ 
कारण तुला शब्दावाचून कळते 
सारे माझ्या मनातले... 
sapna patil ✍️📝

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...