काहीतरी आयुष्य जगले मी
आयुष्य जगता जगता पूर्णच हरले मी....
तसं आयुष्य तर सुंदरच जगले मी....
पण नशिबाला माझं सुंदर जगणं
मान्य नव्हतं कदाचित...
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी...
शेवटी नशिबाने लिहिलेल्या ओळीच ना त्या....
त्यांना पुसायच धाडस तरी कसं करू मी....
जिंकले असते मी आयुष्य....
पण शेवटी नशीबच ना ते....
असह्य एकटेपणाच त्याने
माझ्या कपाळी लिहिलेला कदाचित.....
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी....
तसं आयुष्य तर शेवटपर्यंत
हसतच जगणार होते मी....
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना
मागे सारून टाकणार होते मी.....
पण शेवटी नशीबच ना ते....
नशिबाची लेखणी कधीच
चुकवू शकत नव्हते मी...
म्हणूनच आयुष्य जगता जगता हरले मी.....
Sapna patil ✍️📝
आयुष्य...खूप सुंदर शब्दांत काव्यलेखन केले मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteशुभ प्रभात!🙏