गेले होते मंदिरात काहीतरी मागायला
श्रद्धेच्या नावाखाली दगडाची पूजा करायला
अंधश्रद्धेत मी वाहून देवाच्या
मी तर दगडावर दूध ही वाहिले
पण त्याच्याच दारातील भिकाऱ्याला
मी तडपतांना पाहिले
खूप दान केले मी स्वतः उपाशी राहून
चिमुकल्या जीवाला पण उपाशी मारले
पण दान केलेल्या पैशाचेही
काहिच फायदे नाही जाहले...
जेवढे होते जमा केलेले
तेवढे मी दानपेटीत टाकले
वाढले फक्त पोट पुजाऱ्याचे
आम्ही भक्त तर मात्र तसेच राहिले....
Sapna patil ✍️...📝
No comments:
Post a Comment