रात्र ही सरून गेली विरहात तुझ्या
एकटीच राहून गेली आयुष्यात माझ्या
शब्द अंतरीचे माझे निशब्द होऊन गेले
उलटून रात्र गेली विरहात तुझ्या
वेळ ही सरता सरून गेली
आठवण तुझी मात्र कायम राहून गेली
निशब्द होऊन मी माझ्या
मुक्या ओठांनी बंदिस्त राहून गेली
रात्र ही सरता सरून गेली
एकटीच होते एकटीच आहे
आणि एकटीच राहिले
विरहात तुझ्या आयुष्य सारे सरून गेले
Sapna patil ✍️📝
No comments:
Post a Comment