कालचे पाच मिनिट संपले नाही आहेत....तर
आजचे दहा मिनिट संपतील कधी....
कालच्या पाच मिनिटांची वाट बघता बघता एक रात्र उलटून गेली....
पाच मिनिटांची वेळ मात्र मध्येच थांबून गेली....
पहाट झाली....दिवस उगवला....पण
पाच मिनिटांची वेळ मात्र मध्येच पूर्ण रात्रच गाठून गेली...
सकाळची दुपार झाली कालच्या पाच मिनिटांची आठवण मला आली .....म्हा्
म्हटलं विसरून जाऊ कालच्या पाच मिनिटाला....
तर कालच्या पाच मिनिटाला विसरून नवीन वेळेला सुरुवात मी केली.....
पुन्हा तेच.....आता तर सुरुवात दहा मिनिटांवर आली...
..........
खरच कालच्या पाच मिनिटांनी आणि आजच्या दहा मिनिटांनी मला वेळेची जाणिव मात्र करून दिली....
😊
Sapna patil....✍📝.....
No comments:
Post a Comment