निद्रेत जागून मी फक्त एकटक पाहत होते....
डोळ्यात दाटून भावना....फक्त मलाच बघत होते....
दाटून कंठ माझा श्वास मी घेत होते....
आयुष्याचा खेळ हा मी न समजताच खेळत होते ...
मनातील स्वप्न माझे आज मी पुसत होते....
डोळ्यात दाटून भावना मी फक्त मलाच बघत होते....
आयुष्यातील माझ्या सारे त्यांच्या विश्वात व्यस्त होते.....
माझ्या आयुष्याचा खेळ मात्र
त्यांच्या उघड्या डोळ्यांनी बघत होते.....
कुणीच नव्हते माझे कुणी न राहिले आता....
मांडून भातुकलीचा खेळ माझा
ते सारे मलाच हिणवत होते.....
भरलेल्या विचारांनी डोळे माझे पणावत होते .....
निद्रेत जागून मी....मलाच एकटक पाहत होते.....
Sapna patil ✍️📝
अप्रतिम पण, चिंतनशील रचनाविष्कार...!✍️👌👌👌
ReplyDeleteभावस्पर्शी लेखन केले सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteखरंच अप्रतिम लिहिलंय ताई
ReplyDelete