मांडणी अशी ही आयुष्याची कधीच मला ती समजली नाही ....
अजूनही चुकत आहेत निर्णय माझे....
वाट ती वळणाची कधीच मला उमगली नाही....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही...
दुःखाची दोरी होती बांधलेली पायाशी माझ्या....
सुखाची वाट मला कधी दिसलीच नाही....
दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करून
दुःख आणले आयुष्यात मी माझ्या.....
पण स्वतःच्या सुखासाठी तर मी कधी झटलेच नाही....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही.....
सोसून दुःख सारे आयुष्य संपले माझे....
नक्की कोणात सुख होते माझे
हे मी कधी समजलेच नाही.....
शोधून सर्व वाटा तरी ती वाट मला सापडली नाही....
Sapna patil ✍️📝
Bअशी ही आsयुष्याजूची कधीच मला समजली नाही...एवानडणी
No comments:
Post a Comment