Wednesday, September 15, 2021

ती वेळ परत यावी

ती वेळ परत यावी 
आपल्या मैत्रीची....
भीती कशाची नसून
खेळलेल्या बाळगलेल्या क्षणांची .....
ती वेळ परत यावी
आपल्या बालपणीची....
भीती कशाची नसून
बिनधास्त जगण्याची ....
ती वेळ परत यावी
आपण एकमेकांना फटकळ पणे
बोलण्याची....
आपण न रागवता 
एकमेकांना समजून घेण्याची....
भीती कशाची नसून 
बिनधास्त बोलण्याची...
ती वेळ परत यावी
आपल्या मिलनाची.....
भीती कशाची नसून
आसुसलेल्या क्षणांची.....

Sapna patil ✍️📝....

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी