परत कधीही न येण्यासाठी....
पण हे मन माझे नेहमी
तुझ्याच जवळ घुटमळत राहील.....
स्वप्न पाहिले होते तुझे मी
पण सत्यात माझ्या तू
नाही....
माझ्या हृदयात तुझी एक हळवी जागा राहील....
एक हट्ट होता तुला मिळवण्याचा
तुझ्यासोबत असण्याचा.....
तुझ्यासोबत जगण्याचा....
पण तो अपूर्ण राहत आहे....
सोबत
आहे म्हणता म्हणता
दूर मी निघून जात आहे....
भेटशील का रे एकदा
गुंज तुझ्या मनातले
कळवण्यासाठी.....
एक क्षण पुन्हा प्रेमाचा मनभरून जगण्यासाठी......
माहीत नाही मला
मी उद्या असेन की नसेन
पण जिथे पण असेन तिथं फक्त तुझी म्हणून जगत असेन...
No comments:
Post a Comment