क्लेश वाटत आहे
या नशिबाचा
सैरभैर झाले मन माझे
ना कुणी या जीवाला सहारा
कधी मिळेल माझ्या या मनाला
सागर लाटे सम किनारा
भरलेले हात असूनही
ओंजळ वाटत आहे खाली
सगळे काही असूनही
मी अशी ही एकटी
कधी मिळेल माझ्या या ओंजलीला
सागर लाटे सम किनारा
गुंतले आहे अशा वादळात
त्यातून निघणे खूप अवघड झाले आहे
कशी सावरू मी एकटी या जीवाला
सांग ना देशील का तू या जीवाला सहारा
कधी मिळेल का या डगमगत्या नोकेला
सागर लाटे सम किनारा...
sapna patil ✍️
No comments:
Post a Comment