असं मला म्हणायचा तू
शब्दावाचून कळते तुला सारे
खूप smart आहेस तू
अंतर आपल्यात असायचे
तर सारं काही डोळेच सांगायचे
ना तुझे शब्द ना तुझा कधी स्पर्श
तरीपण मी तुला माझ्या खूप जवळ भासायचे
ती शांत असलेली संध्याकाळ
तो मनाला स्पर्षणारा वारा
तुझ्या हातात माझा हात
किती छान वाटायचे
पण आपले रस्ते आहेत वेगळे
एकच मनात असायचे
कधी अचानक समोर आलास
तर कळतील ना रे तुला
भाव
सारे माझ्या डोळ्यातले
आता कधीच नाही बोलणार हे ओठ
कारण तुला शब्दावाचून कळते
सारे माझ्या मनातले...
sapna patil ✍️📝
No comments:
Post a Comment