Monday, July 12, 2021

शेवटची भेट...

 आदिती आणि मित हे दोघं एका छोट्याश्या गावात राहत होते.मित 12वी ल होता आणि आदिती 10वी ल होती.दोघं पण शाळेत खूप हुशार विद्यार्थी होते.सगळे त्या दोघांना खूप चांगल्या इमेज ने ओळखायचे.आदिती आणि मित दोघं पण एकमेकांचे चांगले म्हणजे खूप जवळचे friend होते.मग त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल.दोघं पण एकमेकांची काळजी करायचे.त्याच्यामध्ये अस वेगळच प्रेमाचं नातं निर्माण झालं होत.शाळेत पण क्लास सुटला की कॅन्टीन वर जाणे, बोलणे, हसणे चालू असायचे.दोघं पण एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले होते.पण न जाणे त्यांच्या प्रेमाला कुणाची नजर लागली.दोघं पण एकमेकांपासून दूर झाले. 

    आदित आणि मित दोघं खूप प्रेम करायचे. पण त्यांचं अस प्रेमाने बोलण शाळेतील काही टवाळखोर मुलांना पाहवत नव्हत. त्या टवाळखोर मुलांनी त्या दोघांच्या मनात एवढं विष ओतलं की ते दोघं पण एकमेकांपासून दूर झाले.त्या मुलाचं रोजच चालू झालं होत. आदितइला मित बद्दल चुकीचं सांगणं आणि मित ल आदितीबद्दल चुकीचं सांगणं. हा त्यांचा रोजचा कार्यक्रम चालू झाला होता.तरी पण आदिती आणि मितचा एकमेकांवर खूप विश्वास होता. पण शेवटी विष ते विष च असत ते कधीच अमृत बनत नाही.त्या टवाळखोर मुलांनी आदिती आणि मित च्या मनात एवढं विष ओतलं की त्या दोघांना vegl व्हावं च लागलं.असच रोज रोज आदिती आणि मितला काहीपण सांगून त्या मुलांनी त्यांना वेगळं केलच.खूप दिवस निघून गेले होते. मित 12 वी नंतर पुण्याला निघून गेला होता.आदितीला मितची खूप आठवण यायची.आदितीने शाळेत जाणं पण बंद केलं होत.काहीच खायची नाही काहीच नाही. आदीतीला घरच्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आदिती कुणाचच ऐकायला तयार नव्हती. काही दिवसानंतर आदिती खूप आजारी पडली.आणि आदीतिला brain cancer झाला.तिला जळगांवला घेऊन गेले.तिथं तिचा थोडा फार उपचार करण्यात आला. पण तिथल्या डॉक्टरांना हर मानवी लागली आणि त्यांनी तिला पुढे हल्वण्याचे सांगितले म्हणजेच तिला मुंबईला घेऊन जाण्याचे सांगितले पण आदितीची घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे घरच्यांनी हार मानली. आणि तिला जळगाव मधेच दुसऱ्या हॉस्पिटल मधे mr Rajesh dabhi यांच्या हॉस्पिटल मधे दाखल केलं. आदितिला हॉस्पिटल मधे दाखल होऊन एक महिना झाला होता तरीही आदितीच्या तब्बे त मधे काहीच फरक पडत नव्हता.उलट तिची प्रकृती अजुनच गंभीर होत चालली होती. आदितीला कळून चुकलं की आपली आता शेवटची स्टेप आहे .आपण यातून बाहेर पडण अशक्य आहे .तेव्हा आदिती ल मित ची खूप आठवण यायला लागते.आदिती तिथल्याच एका नर्सला मोबाईल मागते.आणि ती मीतला लगेच call करते. आदितच्या पोटात खूप दिवसापासून अन्नाचा कण सुद्धा नव्हता. तीच्याने बोलल्या जात नव्हत.तरीपण आदिती तशीच हळू आवाजात बोलतो.

आदिती : हॅलो

मित : हॅलो

आदिती : हॅलो (मित ने आदिती चा आवाज लगेच ओळखला) पण आदिती वरचा राग कमीच झाला नव्हता.मित अजूनही रागातच होता. 

मित : hmmm.... कशी आहेस. आता का केलाय तू मका फोन. अदिती मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीय. निघून जा माझ्या आयुष्यातून. (मित रागाच्या भरात आदीत. ल खूप काही बोलून टाकतो.)

आदिती : हो रे मित मी जाणारच आहे कायमची तुझ्या आयुष्यातून . तुझ्या आयुष्यातून काय तर मी हे जगच सोडून जाणार आहे.पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर ना रे please. 

मित खूप हळव्या मनाचा असतो .त्याच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. आणि म्हणाला तू कुठे आहेस आदिती. काय झालं .अस का बोलतेय तू. काय झालं सांग ना ग मला...

(आदिती खूप रडते.)

आदिती : मी हॉस्पिटल मधे आहे रे...

मित : का काय झालं... (खूप भावूक होऊन बोलतो)

आदिती :मित मी आज मरणाच्या दरात उभी आहे रे . मला brain cancer झालंय.... 

( हे ऐकताच मित च्य पायाखालची जमीनच सरकते. आणि तो तसाच खाली पडतो.)

अदिती रडतच बोलते...

मित मला शेवटचं एकदा तुला भेटायचं आहे. मला माझा शेवटचा श्वास तुझ्याच कुशीत घ्यायचा आहे रे. मित मला भेटायला ये . 

(मित रडतच बोलतो ) हो मी येतो....

( मित पुण्याला असतो . मित ल जळगांवला यायला पूर्ण एक दिवस आणि एक रात्र लागते. मित रूम वर जातो आणि खूप रडतो.आणि स्वतःलाच कोसतो.मित लगेच जळगाव बस पकडतो. )

दुसऱ्या दिवशी मित direct hospital मधे पोहचतो. आणि आदिती जवळ जातो.आदिती ची हालत मित ल पहवल्या जात नाही.मित तिला बघून खूप रडतो आणि तिच्या गळ्यात पडतो. 

मित : माझी गुलाबाच्या कलीसारखी दिसणारी माझी आदिती आज कशी दिसत आहे ( अस बोलतो आणि खूप रडतो) 

( दोघं पण खूप रडतात) 

आदिती : मित मला तुझ्या कुशीत झोपू दे ना रे....मला त्तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू कायमच....मला माझा शेवटचा श्वास तुझ्याच कुशीत घ्यायचा आहे. एवढीच इच्छा माझी पूर्ण कर.

मित आदितील त्याच्या कुशीत घेतो . तीच डोकं त्याच्या मांडीवर ठेवतो. तिचा हात त्याच्या हातात घेतो. आणि आदिती हळूच मित ल बघत आपले डोळे बंद करते आणि तिचा शेवटचा श्वास त्याच्या कुशीत सोडते. काही वेळानं तिथं डॉक्टर येतात आणि मित ल बाजूला करतात तर काय मित आणि आदिती ने आपला शेवटचा श्वास सोबतच घेतलेला असतो.सोबतच त्यांची प्राणज्योत मावळली असते.आणि शेवटी आदिती आणि मित ची ही अशी हृदयद्रावक शेवटची भेट ठरते....

Sapna patil ✍️✍️✍️❤️❤️ स्व





No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...