Wednesday, February 28, 2024

गाठ जन्माची बांधताना

जन्माची गाठ बांधताना 
सात वचन आपण दिले
शेवटपर्यंत साथ देऊ
असे वचन होते पहिले

बांधली मी तुझ्यासोबत
साता जन्माची गाठ
शेवटपर्यंत देऊ
एकमेकांना साथ.....

साथ प्रेमाची देऊनी
संसार सुखाचा चालवू
पावलोपावली हात धरून
आनंद आयुष्याचा घेऊ....


जिंदगी गुजर गई

आज मुलाकात होगी उससे
यही सोचते पुरी जिंदगी गुजर गई
मर हम गए
साथ उसकी यादे भी मर गई....

याद तो हर रोज आती थी ओ
उसकी याद मे राते भी गुजर गई
सपनो को भी नहीं छोडा उसने
उसकी याद मे पुरी जिंदगी गुजर गई

पागल थे हम उसकी एक हसी पर
उसके साथ ओ हमारी मुस्कुराहट ले गई
क्या कुसुर था मेरा
ओ हमारी जान भी ले गई....


मैत्री म्हणजे

मैत्री .... एक अथांग समुद्राची लाट
मैत्री.... रोज होणारी पहाट

मैत्री.... साता समुद्रापार
मैत्री.... कधी दोस्त तर कधी यार.....

मैत्री.... सुख दुःखाचा झरा
मैत्री.... सुसाट सुटलेला वारा....

मैत्री म्हणजे सुख दुःखाची सोबत
मैत्री म्हणजे प्रेमाची संगत

मैत्री म्हणजे अतूट विश्वास
मैत्री म्हणजे मनास लागलेला ध्यास

मैत्री म्हणजे मन हलकं करण्याची जागा
मैत्री म्हणजे एक विश्वासाचा धागा

मैत्री म्हणजे मज्जा मस्ती आणि धम्माल
मैत्रीतच असते जगण्याची कमाल 

मैत्री म्हणजे कट्टी आणि बट्टी 
कितीही होऊ दे दंगा तरीही करते ती गट्टी...


एक निवांत क्षण

कधी वाटतं जावं 
त्या नदीच्या तीरावर
मन रमवण्यासाठी
अन् मनसोक्त खेळावं 
त्या वाहत्या प्रवाहासोबत
सारे दुःख विसरून जाण्यासाठी
एक निवांत क्षण जगावा
त्या निसर्गाच्या सानिध्यात 
मनाची चलबिचल थांबवण्यासाठी
घनदाट जंगल आणि तो 
पक्षांचा किलबिलाट ऐकावा
हुरहूर जीवाची घालवण्यासाठी
असाही एक निवांत क्षण जगावा
आयुष्यातील दुःख विसरण्यासाठी....


कॉफी आणि बरंच काही

चल ना जाऊ आपण
त्या पॅलेस हॉटेलवर
घेऊ आपण फक्त कॉफी 
आपल्या पाहिले भेटीवर

तुझ्यासोबत कॉफी घेताना
खूप आवडतं मला
बोलायचं असतं बरच काही
पण कसं बोलू हेच कळत नाही मला....
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

कॉफीचा कप असतो हातात
पण समोर नसतोस तू
एक एक घोट घेत घेत 
फक्त विचारात असतोस तू....
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

जेव्हा घेत असते मी कॉफी
अन् सोबत तू हवा असतोस
बोलायचं असतं बरच काही
पण तू समोर नसतोस 

घेत होते मी आज चहा 
अन् समोर तू होतास
बघत होते डोळ्यात तुझ्या
पण तू मात्र कुठे गुंतला होतास



एक स्वप्न मी पाहिलेले

एक स्वप्न होते मी पाहिलेले
निसर्गाच्या कुशीत घर माझे वसलेले
त्यात राहावे फक्त तू अन् मी
एकमेकांना सोबत जपलेले

खिडकी माझी उघडताच
दिसावे मज ते सुंदर मनमोहक दृश्य
पिसारा फुलवून मोराने
दिसावे मज त्याचे सुंदर हास्य

खळखळ वाहणारे पाणी
रोजच मला दिसावे
हिरव्या झाडांच्या सावलीत
रोजच मी बसावे

तो पक्षांचा किलबिलाट ही
रोजच ऐकू यावा
उडताना तो पोपट ही
मला बघून हसावा 


तुझ्यात जीव रंगला

धुंद झाले मी तुझ्या प्रीतीत 
वाट बघते तुझ्या येण्याची
रंगला तुझ्यात जीव माझा
साद घाल तू प्रीत गंधाची

आवर घालते मी स्वतःस
भास होतो तरी तुझ्या चाहुलीचा
का होते मज असे 
आभास ही होतो तुझ्या सावलीचा

छळते का हे मला मन माझे
प्रीतीत तुझ्या रंगताना
रंगून जातो जीव माझा तुझ्यात
आरशात मी स्वतःस बघताना


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...