पेरलेल्या दाण्यानो काळ्या मातीतून रुजून या
परिस्थितीशी लढण्याची तयारी तुम्ही करून या
पाऊस येवो का ना येवो तुम्ही मात्र भिजून या
पेरलेल्या दाण्यानो काळ्या मातीतून रुजून या
बळीराजाचा जीव तुम्ही त्याच्यासाठी तरी जगून या
पेरलेल्या दाण्यानो काळ्या मातीतून रुजून या
शेतकऱ्यांची पोर मी गरिबीची मला जाण आहे
पेरलेल्या दाण्यानो शिवरायांची तुम्हा आन आहे.....
एक एक दाणा पेरत जाऊन खोलवर तुम्ही रुजून या
बळीराजाच्या काळजाची मात्र हाक तुम्ही ऐकून या
पेरलेल्या दाण्यानो काळ्या मातीतून तुम्ही रुजून या...
परिस्थितीशी लढण्याची तयारी तुम्ही करून या....
स्वप्नमयी.....✍🏻✍🏻