संपेल का कधी
प्रेम माझ्या मनातले
तुला कळेल का कधी....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
खूप अंतर होते आपल्यात
लग्नानंतर जुळून आले
ते नवे ऋणानुबंध
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने
आयुष्यात दरवळला आपल्या
प्राजक्ताचा सुगंध.....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
अंतर होते आपल्यात
ते एका क्षणात मी दूर केले
पण अंतर होते कशामुळे
हेच कोडे न उलघडले....
स्वप्नमयी...✍🏻✍🏻✍🏻
आपल्या दोघांमध्ये सख्या
कधीच अंतर येऊ देणार नाही...
जन्म भरासाठी बांधलेली गाठ सख्या
मी कधीच सुटू देणार नाही....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
तू आलास आयुष्यात आणि
आयुष्य सारे सप्तरंगानी भरून गेले
पण असे अचानक तुला काय झाले
आपल्यामध्ये द्वेषाचे अंतर हे आले....
स्वप्नमयी.....✍🏻✍🏻
अंतर हे आपल्यातले
सखे सहन होत नाही
आठवण तुझी खूप येते
कुठेच मन लागत नाही....
स्वप्नमयी......✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment