Friday, July 15, 2022

ओल्या सरी

तू यावं अन् चिंब होऊन जावं
ओल्या सरित भिजताना 
जशी अविरत झुलते ती वेल
पाण्यावर तरंगताना
स्पर्श व्हावा तिचा अन्
भान हरपावं माझं.....
तिच्या मिठीत शिरताना.....
मंत्रमुग्ध व्हावं तू
ओल्या सरीत भिजताना....

✍🏻✍🏻 स्वप्नमयी....


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी