Saturday, July 9, 2022

पांडुरंग ( अभंग )

उभा विटेवरी 
माझा पांडुरंग हरी
टाळ मृदुंग करी
पैजनांचा नाद...

कर उभे कटेवरी 
दुमदुमली ही पंढरी
भक्त भजनात दंगली
तुझ्या पांडुरंगा....

हरी कीर्तनात 
सारे वैष्णव नाचती
मुखी नाव घेती 
तुझे पांडुरंगा....

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी