Sunday, November 28, 2021

घेऊनी उंच भरारी

 


आकाशात घेऊनी उंच भरारी 

तेव्हा बघेल ही दुनिया सारी

स्वप्न करुनी साकार

बघुया ती किमया न्यारी

देऊनी पंखांना बळ

आसमंतात मारू भरारी....

जिवापाड करू प्रयत्न

गरुडाप्रमाणे घेऊ भरारी....


स्वप्नकवी.....✍️✍️✍️✍️


             धुंद हा गारवा....              मनी माझ्या भावला              सायंकाळ झाली असता              नभात विरघळला...              चांद रात्रीला तू              स्पर्श करून गेला              तुझ्या स्पर्शाने चांद              रात्रीत ही मोगरा फुलला...              धुंद हा गारवा...              मज बेधुंद करुनी गेला....              साज ह्यो तुझा              घायाळ मज करुनी गेला...              मज वेड लावुनी गेला               धुंद हा गारवा....              तुझ्यात हरवून सांजवेळी              खेळ स्वप्नांचा पहावा....              ओढ तुझी लावी या जीवा              धुंद हा गारवा....              चंद्राच्या शितलतेत मला              निरखून पहावा.....                                 Sapna patil ✍️✍️✍️

   


          

धुंद हा गारवा....              

मनी माझ्या भावला              

सायंकाळ झाली असता              

नभात विरघळला...              

चांद रात्रीला तू              

स्पर्श करून गेला             

 तुझ्या स्पर्शाने चांद             

 रात्रीत ही मोगरा फुलला...              

धुंद हा गारवा...              

मज बेधुंद करुनी गेला....              

साज ह्यो तुझा              

घायाळ मज करुनी गेला...              

मज वेड लावुनी गेला               

धुंद हा गारवा....              

तुझ्यात हरवून सांजवेळी              

खेळ स्वप्नांचा पहावा....              

ओढ तुझी लावी या जीवा             

 धुंद हा गारवा....              

चंद्राच्या शितलतेत मला              

निरखून पहावा.....                                 Sapna patil ✍️✍️✍️

माणसात माणूस दिसलाच नाही



असं कसं हे आयुष्य....

मातीमोल झालं....

नाही अर्थ राहिला या जगण्याला....

होत्याचं नव्हतं झालं....

सोडून आयुष्याची वाट....

सारं काही सुनं केलं...

नाजूक मन ही आज पाषाण झालं...

फुलासारखी कळी कोवळी 

मन ही आज कोमेजून गेली....

क्रूर पाषणासारखी मन मात्र 

आज उमलून आली....

पण माणसात माणसं कधी 

दिसून च नाही आली....

स्वप्नकवी.....







Saturday, November 27, 2021

अफझल खान अजूनही जिवंत आहे.....



 कोण म्हणत अफजल खान मेला होता ? मेला होता तो फक्त शरीराने . विचार आणि प्रवृत्तीने तर तो अजूनही जिवंत च आहे. धर्मनिरपेक्ष भारताला प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या छत्रपती राजांची शिकवण. ज्याप्रमाणे 361 वर्षापूर्वी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता त्याचप्रमाणे आताही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. अफजल खान रुपी विचार प्रवित्तीना समुळ नष्ट करून पुन्हा शिवशाही प्रस्थापित करण्याची गरज आहे. कदाचित हीच शिवप्रताप दिना ची खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल...... जय शिवराय जय जिजाऊ...

बघताय ना महाराज....

 




अक्षरशः लाज वाटायला लागलीय मी भारतीय असल्याची.मी एक स्त्री जन्म घेतल्याची.लाज वाटतेय मला.... अहो या माझ्या छत्रपती राजाच्या राज्यात स्त्रीला किती आदराने पाहिले पाहिजे.... आज त्यांच्याच जीवसोबत तुम्ही खेळात आहात...काय केलं होत त्या 17 वर्षाच्या मुलीने तिच्यासोबत त्या नराधमांनी इतके वाईट कृत्य केले.... अशा नराधमाला तर भर रस्त्यात जाळलं पहिजे... पण बिचाऱ्या गरिबांचा कुणी ऐकत नाही.... ज्यावेळेस कोपर्डी च्या मुलीवर बलात्कार झाला होता त्यावेळेस मराठा समाजाच्या मुलींनी अख्खं मुंबई हादरून टाकल होत तेवढ्यावरच थांबल्या नव्हत्या तर आज मुंबई भगवी केलीय उद्या दिल्ली भगवी करायला वेळ लागणार नाही असे बोलल्या होत्या तेव्हा त्यांनी खूप आवाज उठवले होते.... तर आता का कुणीच आवाज उठवत नाहीय... का ती पण एक मुलगीच होती ही पण एक मुलगीच आहे ना. का कुणाचां आवाज बाहेर निघत नाहीय... का ती तुमच्या समाजाची नहिय म्हणून..... कधी संपेल हा जातीयवाद..... जात , पात, धर्म, भेदभाव कधी संपेल हे सगळ .... पाहत आहात ना महाराज तुमच्याच राज्यात चाललाय काय....

इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण कुणाची माय.....

आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पहावं लागत.....

एकटा आला तर लढता येईल,.... पण झुंडीपुढे नमावच लागत... साले उपभोग तर घेतातच नंतर जिवानिशी मरतात... शिक्षा व्हायचं लांब.... फक्त candel मार्क्स जाळतात.... अत्याचार होतो 10 मिनिटात नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पहावी लागते.... न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागते... शिवराज्यचे फक्त धडे वाचले आम्ही... त्यातून धडा तर काही घेतलाच नाही... शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेरालाच नाही... वाईट वाटत महाराज.... अहो पण नुसत वाईट वाटत पेपरमधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत... महाराज.... आज पुन्हा तुमचा अवतार .... आम्हा स्त्रियांना हवाय... जिथल्या तिथे. फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय.....

राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे अशी आमची इच्छा आहे....

Hello friends....

माझी एकच इच्छा आहे की आपण खूप म्हणतो की राजे पुन्हा जन्माला या.... पण राजे पुन्हा जन्माला येईपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असेल... तर माझं एकच म्हणणं आहे की राजाला पुन्हा जन्माला घातल्या पेक्षा आपणच आपल्यातील त्या राजाला जागं करा... आपण त्यांचे गुण आपल्या अंगी असू द्या... त्यांचे विचार लोकशाहीत आणा... आणि स्त्रियांचा आदर करायला शिका.... जर तुम्ही आपल्या बहीण प्रमाणेच दुसऱ्यांच्या घरातील मुलींना पण बहीण प्रमाणेच आदर दिला तर तुमच्यामध्ये महाराज पुन्हा जन्माला येतील... तर तुमच्या याच विचारांमुळे तुमचा मान राखण्यासाठी... येणाऱ्या पिढीमध्ये एक राजे नव्हे तर अनेक राजे जन्माला येतील.... अहो महाराजांनी तर शत्रूला पण मित्र बनवला होता तो फक्त त्यांच्या विचारांमुळे.... यातूनच स्पष्ट होते की महाराज स्वतः हिंदू धर्माचे संस्थापक असून सुद्धा.... कधी जातीभेद केला नाही... तर आपण महारांचे शिवभक्त असूनसुदधा त्यांच्यासाठी इतके ही करू शकत नाही .........


Take a respect.....

..... Give a respect...... 🙏🙏🙏

एका स्त्रीची जिद्द...



 प्रत्येक स्त्री च्या मनात एक जिद्द असली पाहिजे ... की ती कोणतीही गोष्ट असो ती सहजपणे करू शकते . जोपर्यंत ती चूल आणि मूल या पर्यंतच जर का मर्यादित असेल तर ती तीच अस्तित्व काहीच नाहीय . आणि जेव्हा ती या बंधनातून मुक्त होईल तेव्हाच तिची एक नवीन ओळख ,एक अस्तित्व निर्माण करेल . पण या आपल्या भारतातील स्त्रियांना पायाची धूळ समजली जाते . लोकांच्या याच विचारांमुळे आज किती तरी मुलींवर अत्याचार होताना दिसत आहे . किती तरी स्त्रियांना molested केलं जातंय .आजही स्त्रियांना कमी लेखलं जाते. काहींना तर या जगात येण्यापासून थांबवलं जात आहे. आज स्त्री वर्ग अजूनही समाजाच्या समाज व्यवस्थेत अडकून पडलाय . लोक काय म्हणतील हे शस्त्र अजूनही काही स्त्रियांना रोखून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत... प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण एका स्त्री ने काहीही ठरवले तर ती पूर्ण करू शकते एवढं धाडस तीच्यामदे असते .... म्हणून जर आपल्या देशाला , समाजाला पुढे न्यायचे असेल तर एका स्त्रीला पुढे जाऊ द्या तिचा आदर करा आणि तिला बोलू द्या .शेवटी तुम्ही नक्कीच एका प्रगती पथावर असाल ..... जय हिंद जय महाराष्ट्र... जय जिजाऊ जय शिवराय....

स्वप्न....

 


स्वप्न पाहिलं होत मी उंच आकाशात भरारी घेण्याचं

आकाशातील पक्षांप्रमाणे उंच उडण्याच 

माझ्या निरागस दुभंगलेल्या पंखांना बळ देण्याचं




शिवराज्याभिषेक दिन

 


आज शिवराज्यभिषेक दीन. हिंदवी स्वराज्यातील एक महत्त्वाची घटना.संपूर्ण भारतभूमी साठी अतिशय मोलाचा दिवस म्हटल तरी हरकत नाही. पण कुणी म्हणेल या राज्यभिषेक अस काय मोलाचं आहे. याआधी ही अनेक राजे भारतवर्षात होऊन गेले.अनेक राजसत्ता अस्तित्वात होत्या. मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का डोक्यावर घेतल जातं. का त्यांच्याच नावाचा सगळीकडे जयजयकार केला जातोय .तर सर्वांना सांगायचं एकच आहे की, एकतर शिवरायांना राजसत्ता ही घरानेशहींनी मिळाली नव्हती. मग ना की एखादा थोरला पुत्र त्याचे काही कर्तृत्व नसताना हो बसलाय गादीवर. असही नव्हत. शिवरायांनी अक्षरशः शून्यातून सुरुवात करून एखादा युगपुरुष शून्यातून आपल विश्व निर्माण करू शकतो.कसा आपल्या अस्तित्वाचा प्रभाव अख्ख्या जगावर पाडू शकतो. आपल्याला कमी लेखणार्याना काही आपली दखल घ्यायला लावू शकतो.हे एका राज्यभिषेक सोहळ्याने दाखवून दिले .ज्या स्वराज्याच्या उभारणीसाठी अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली.घरदार मुले बाळे कशाचीच पर्वा नाही केली.घाम घालून ज्या स्वराज्याचा एक एक चिरा रचला, त्या स्वराज्याचा राज्यभिषेक एक कळस होता.अप्रत्यक्षरित्या त्या वीरांच्या बलिदानाची, मेहनतीची, ध्येयपूर्तीसाठी झपाटलेल्या त्या सर्यांच यश म्हणजेच राज्यभिषेक सोहळा.तसेच अख्ख्या देशाची आणि खासकरून मराठी सत्तेचा इतिहास आणि दिशा ठरवणारी स्वराज्य भिषेकाची अत्यंत महत्त्वपूर्ण घटना.जी आजही तितक्याच अभिमानाने साजरी केली जाते आणि आम्हाला हिंदवी स्वराज्याची , युगप्रवर्तक राजाची ,आणि आमच्या स्वत्वाची सदैव आठवण करून देते ही घटना. 

*जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र*

स्वप्नकवी.....✍️✍️

आयुष्य...



 खरचं असच काहीसं आयुष्य आपण जगत असतो ....सागरातून जसे मोती काढण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात तसच....काहीस आयुष्य प्रत्येकाला जगावे लागते.किती वेदना किती त्रास किती संघर्ष करावा लागतो आयुष्यात....तरीपण आपण त्या येणाऱ्या अडचणी येणाऱ्या संकटाना सामोरं जाण्याची ताकद आपण ठेवतो...पण शेवटी नशीब असते की ते आपण जगण्यासाठी रोज धावपळ करायला लावते.....आणि आपण रोज ते जगण्यासाठी धावत असतो....कितीही संकट आले तरीही आपण मागे सरत नाही.....पण शेवटी नशिबाने साथ नाही दिली तर आपण हरतो.... पण कुठेतरी पुन्हा उमेद निर्माण होण्याची अपेक्षा असते....आणि ती कायम असली पाहिजे....हेच या कवितेतून मी सांगितले आहे....

स्वप्नकवी....✍️✍️

शिवाजी म्हणजे काय...

 


एक मराठा लाख मराठा.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


आम्ही का वाचतो शिवरायांचा इतिहास, का त्यांच्या नावाचा जयघोष करत असतो, काय त्यांच्या नावाने आमच्या अंगावर शहारे येतात, कारण शिवाजी म्हणजे फक्त इतिहास नाही, शिवाजी फक्त भूतकाळ नाही, शिवाजी फक्त राजा नाही ,शिवाजी फक्त कादंबरी नाही, तर शिवाजी आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान, आमची प्रेरणा. शिवाजी म्हणजे स्फूर्ती ,शिवाजी म्हणजे त्याग, शिवाजी म्हणजे शौर्य, शिवाजी म्हणजे देशभक्ती, शिवाजी म्हणजे मातृसेवा ,योगसाधना ,तपश्चर्या ,धैर्य, परिश्रम,

शिवाजी म्हणजे प्रेम, शिवाजी म्हणजे शिस्त, शिवाजी म्हणजे जबाबदारी शिवाजी म्हणजे अभ्यास, विद्या.

शिवाजी म्हणजे नेतृत्व, शिवाजी म्हणजे नायक, शिवाजी म्हणजे न्याय, शिवाजी म्हणजे धर्म, आणि जेव्हा जेव्हा आम्हाला ऊर्जा हवी असेल तर आम्ही हे शिवाजी नावाचं अमृत नक्कीच घेऊ. आणि आता ही वेळ आली आहे ते शिवामृत घ्यायची...... घ्या मराठ्यांनो शिव अमृत घ्या आणि जागे व्हा..... एक मराठा लाख मराठा शेवटपर्यंत अशीच राहू...... जय शिवराय जय जिजाऊ.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

स्वप्नकवी.....

नात्यात गुरफटणं आता जमत नाही



जमत नाही आता नात्यात गुरफटायला

त्रास होतो खूप स्वतःलाच सतवायला


तोडलेले नाते पुन्हा कसे जोडू

तुटलेलं माझं मन पुन्हा कसं तोडू


भावनांना आता मनात आणता ही येत नाही....

नातं प्रेमाचं आता जोडता ही येत नाही

स्वप्नकवी.....✍️✍️


Friday, November 26, 2021

फक्त तुझ्यामुळे

 



आज कविता करत आहे

मी ते फक्त तुझ्यामुळे

याआधी खूप भोळी होते रे मी
तेव्हा तर मला काहीच कळे

नंतर मी शब्दाशब्दांची
जुळवणी करून कविता मी रचल्या
लाख प्रयत्न केले दुसऱ्या
गोष्टींवर लिहिण्याचे
पण त्या तुझ्यावरच सुचल्या

तुझ्या आठवणी शब्दात मांडत गेले
तुझं ते हास्य रूप मनात साठत गेले

माझ्या भावनांना कवितेच्या
रुपात व्यक्त मी केले
त्या भावना पण तुझ्याच होत्या
त्यांना शब्दाशब्दात गुंफत गेले

तू जिथे पण असशील तिथे
तू मझ्या कविता वाचशील
मी कविता तुझ्याकडून शिकले
आयुष्यभर मी तुझी ऋणी राहील

तुझ्या आठवणींचा संच भरून
ठेवलाय मी माझ्या मनात
त्यातूनच मी मन मोकळ करतेय
या कवितेच्या रुपात

तुझं ते गोंडस रूप मी
माझ्या डोळ्यात साठवतेय
जिथं जाते तिथं दुसर काहीच नाही
मी फक्त तुलाच आठवतेय

तुझ्या कवितेच्या ओळीनी
मनात काहूर माजलयं
तुझा शब्द शब्द माझ्या
हृदयात सजलयं 

तू माझ्या आयुष्यात आलास
म्हणून मी कविता करायला शिकले
तू जिथे पण असशील तिथून
माझ्या कविता वाच 
तुझ्याच शब्दांनी मी कवितेला लिहिले...

सर्वांचा विश्वास आहेस तू
माझ्यासाठी गोंडस आहेस तू
सर्वांसाठी एक बेधुंद पाखरू आहेस तू
कायम सर्वांसाठी असच रहा
तू जिथं पण असशील तिथं सुखी राहा
हीच सदिच्छा
तुला कविता दिवसाच्या खूप
खूप खूप साऱ्या शुभेच्छा

पेरणी....🌾🌾🌾🌱🪴



मातीच्या सरित 

चला तिफण घालूया

आला पावसाळा

चला पेरणी करूया


टाका झोळीत बियाण

भूक ती पोटाची पेरुया

खुश झाला बळीराजा

सारं शिवार घुमुया


ओस पडला शेतात 

सारं वावर फिरुया

पोट जगाचं भराया 

रान जिवाचं करूया


दाणं पेरलं मातीत

रान हिरव करूया

पिकात उगवल तन 

त्यात खुरप घालूया 


स्वप्नकवी....✍🏻✍🏻🪴🌱🌾🌾





Wednesday, November 24, 2021

समुद्रकिनारी वादळं शमवावी



समुद्रकिनारी बसून आठवण तुझी यावी

डोळ्यात पाणी दाटून मनातील वादळं शमवावी 

उसळणाऱ्या लाटा किनारी लागून 

मनातील सलही आकुंचून जावी

हृदयी प्रेम जागून मनातील वादळं अतृप्त व्हावी....


dreamword....✍️✍️




 

Saturday, November 20, 2021

घुसमट



घुसमट होते या जीवाची....
जेव्हा पंख माझे छाटले जातात...
मनातील वेदना ही मग....
तेव्हा निशब्द होऊन जातात.....

sapna patil...✍️

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...