Tuesday, November 29, 2022

संविधान.... डॉ बाबासाहेब आंबेडकर

संविधान लिहिले बाबासाहेबांनी
जीवन सारे हक्कासाठी वेचले
जात धर्म पंथ न बघता
आयुष्य सारे लोकांसाठी खचले

महान होता तो महापुरुष 
त्याने स्वतःच्या धर्माचा त्याग केला
दलित बांधवांच्या हक्कासाठी त्याने
बौध्द धर्म स्वीकारला

रात्रंदिवस जागा राहून 
साहेबांनी संविधान लिहिले
त्या कोऱ्या कागदांवर
अख्खा देश चालत आहे 
आज माझ्या भीमाच्या शब्दांवर

2 वर्ष 11 महिने 18 दिवस 
सविधानाचा पाया त्यांनी रचला
फक्त माझा बापच हो 
फक्त माझा बापच 
अख्ख्या देशासाठी झटला

स्वतंत्र समता बंधुता 
राष्ट्रीय एकात्मता 
धर्मनिरपेक्षता समाजवाद 
लोकशाही गणराज्य 
प्रस्थायी त्यांनी केले.....
भारताची सार्वभौम 
जगप्रसिद्ध राज्यघटना लिहून
त्या घटनेचे भारतरत्न 
शिल्पकार ते ठरले....


Thursday, November 24, 2022

काहीतरी लिहावं

रोज वाटतं मनाला की 
तुझ्यावर काहीतरी लिहावं
मला पडलेलं कोडं
कवितेत उलघडावं 
वास्तवात नाही तर 
शब्दात तरी तुझं बनावं
खूप वाटत मनाला माझ्या
एकदा तरी तुझ्यावर काहीतरी लिहावं
लिहिता लिहिता मन तुझ्यात गुंतवाव 
या स्वप्नमयी डोळ्यानी 
फक्त तुलाच बघावं
या अबोल ओठांना ही 
शब्दांनी बोलकं करावं
आणि मनसोक्त व्यक्त व्हावं 
त्या कवितेच्या ओळींमध्ये 
.....................................

जडला माझ्यात तो छंद प्रितीचा
मन कोवळ्या प्रीत गंधाचा
हरवून जावा तो ही माझ्यात
असाच दरवळावा तो गंध प्रितीचा


Wednesday, November 23, 2022

जीवन म्हणजे

जीवन म्हणजे ......शेवटच्या श्वासापर्यंत प्रवास चालणारा
जीवन म्हणजे..... धावपळीच्या जगात हरवलेली नाती जपणारा
जीवन म्हणजे..... कुणाच्या तरी गोड हसण्याच कारण बनणारा 
जीवन म्हणजे .....आपलं दुःख दुसऱ्यांसोबत वाटून घेणारा
जीवन म्हणजे.... दुसऱ्यांच्या दुःखात न सांगता उभा राहणारा 
जीवन म्हणजे राग मत्सर क्रोध यांचा त्याग करणारा
जीवन म्हणजे..... पैसा आहे खूप गरजेचा पण जेवढं आहे तेवढ्यात समाधानी मानणारा 
जीवन म्हणजे.... मन जेव्हा समाधानी असत तेव्हा कसं सुंदर असत जग हे अनुभवणारा 
जीवन म्हणजे..... हरवलेल्या नात्यासाठी आयुष्यातला थोडा का होईना पण वेळ काढून नातं जपणारा
जीवन म्हणजे.... आता मिळालेल्या क्षणाचा आनंद घेणारा 
जीवन म्हणजे .....उद्या काय होईल याचा विचार न करणारा
जीवन म्हणजे.....या क्षणाला जीवन आहे आपलं उद्या असेल या नसेल म्हणून आताचा क्षण मनसोक्त जगणारा
जीवन म्हणजे.....पंख नसताना ही भरारीचे स्वप्न बघणारा
जीवन म्हणजे....उत्तुंगणारा ध्यास
जीवन म्हणजे.... न अडखळत चालणारा प्रवास
जीवन म्हणजे.... पहाटेची सोनेरी किरणं
जीवन म्हणजे.... न उलगडणार स्वप्न 
जीवन म्हणजे .... उद्याची होणारी पहाट
जीवन म्हणजे.....स्वप्नांचा होणारा लखलखाट


Wednesday, November 16, 2022

पर्वरिश

गैरो को तकलीफ थी मुझसे
अपने भी रुठे थे मुझसे
परवरिश तो अच्छी की थी सब ने मेरी
फिर भी क्यु गलतिया हुई मुझ से


माणूस शोधते मी

गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी.....

हरवले आज मी गर्दीत माणसांच्या
गर्दीत राहून माणसांच्या स्वतःस हरवून टाकले मी

अंधारल्या दिशांमध्ये वाट शोधते मी
दानव रुपी मानवाशी झुंजनारी लाट शोधते मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

या वासनांध दुनियेत प्रेम शोधते मी
या अविश्वासू दुनियेत मित्र शोधते मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी 

अंधारल्या दिशा काळोख दाटला
या शैतानी काळोखात प्रकाश शोधते मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी 


असेही एकदा व्हावे..... पार्ट 2


नजरेत बघावे मी तुझ्या
बघताच मी हरवून जावे
कळतील मज भावना तुझ्या
असेही एकदा व्हावे

छेडीले मनास तू माझ्या
नजरेस नजर तुझी भिडावी
स्तब्ध व्हाव्यात डोळ्यातील भावना
असेही एकदा व्हावे

रात्र ही उलटून जावी 
स्वप्ने ही बहरून यावे
असावी मी सोबत तुझ्या 
असेही एकदा व्हावे

गंध चाफ्याचा दरवळावा
फुले ही उमलून यावे
प्रितीत फुलावी मी ही तुझ्या
असेही एकदा व्हावे

जीव ही वेडापिसा व्हावा
मन ही गहिवरून यावे
स्पर्श ही प्रेमाचा व्हावा कुशीत तुझ्या
असेही एकदा व्हावे 

निशा ही सांगून यावी
निद्रा ही उडून जावी
मीच असावी हृदयात तुझ्या 
असेही एकदा व्हावे

तुझी चाहूल वाटावी
स्वप्न ही रंगून यावे
ओठ ही निशब्द व्हावे प्रेमात तुझ्या
असेही एकदा व्हावे

श्वास हि तुझाच व्हावा
स्पंदने ही सांगून जावे
मीच असावे काळजात तुझ्या 
असेही एकदा व्हावे

प्रीत ही अशी फुलावी
मने ही खुलून यावे
मिठीत असावी मीच तुझ्या 
असेही एकदा व्हावे

पावसाची सर ही यावी
दोघं ही चिंब चिंब भिजावे
हरवून जावे डोळ्यात बघताच मी तुझ्या 
असेही एकदा व्हावे

वेल ही झाडावरची अलगद झुलावी
समुद्रातील लाटेनेही स्तब्ध व्हावे
असे स्वप्न बघावे सोबत मी तुझ्या 
असेही एकदा व्हावे

प्राजक्ताची कळी ही फुलावी
चाफ्याची फुले ही उमलावे
गंध तो सुटावा प्रेमाचा तुझ्या 
असेही एकदा व्हावे

दोन चाकरिने संसार चालावा
आयुष्यात तूही माझ्या रंग भरावे
हे क्षण ही जगावे मी आयुष्यात तुझ्या 
असेही एकदा व्हावे

आहेस तु कुणाच्या कुशीत
ते प्रेम तुझी मला का न मिळावे
राहायचे होते हृदयात तुझ्या
असेही एकदा का न व्हावे

सोबत राहायचे आपण दोघे
कदाचित देवालाही हे मान्य नसावे
म्हणून ती यावी जीवनात तुझ्या 
असे आपणास का न कळावे

का असावे दूर आपण
देवाने ही दूर का ठेवावे
नशिबाच्या खेळात हरलो आपण दोघे
असेही आयुष्यात कधीच न व्हावे


कही खोया हैं वो

ये खिला खीला सा फुल 
आज मुरझाया क्यू है
ये हसता खेलता चेहरा
आज कही खोया क्यू है.......


Sunday, November 13, 2022

हृदय माझं फुल पाखरासारखं

हृदय माझं फुलपाखरासारखं 
का तू तोडल
काय चूक होती माझी
दिलेलं वचन तू क्षणात मोडलं 

फुलपाखरासारख्या हृदयाला 
बसला शब्दांचा मार
प्रेमात मिळाला दगा
आणि हृदय झालं माझं सर्व बेजार

हृदय माझं प्राजक्ताच फुल 
ते ही फुलपाखरासम भासे
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात
फक्त तुझाच चेहरा दिसे


असेही एकदा व्हावे

तुझी चाहूल वाटावी
फुले ओसंडून जावे
असेही आयुष्यात एकदा व्हावे

ती स्वप्नात यावी
सत्य मला न कळावे
असेही एकदा व्हावे

स्पर्श तिचा व्हावा
अंग शहारून जावे 
असेही एकदा व्हावे

ती सुंदर असावी
जगही तसेच सुंदर असावे
मला न दिसताच कळावे 
असेही एकदा व्हावे

तिने आयुष्यात यावे 
तिच्या डोळ्यानी मी जग बघावे
असेही आयुष्यात एकदा व्हावे


निरागस प्रतिबिंब

मंद कोवळ हे मन तुझं
तुझं हे निरागस प्रतिबिंब
चंद्र चांदण्यांची रात जणू
चौफेर दरवळणारा सुगंध

सुंदर अलवार साजनी तू
मंद वाऱ्याची तू मोहर
निरागस गोंडस हास्य तुझं
डोळे तर सप्तरंगी कहर


नातं तुझं माझं देवा

तुझं नि माझं नातं देवा 
असच घट्ट राहील
तुझ्याकडे माझा 
फक्त हाच हट्ट राहील

तुझी कृपा समर्था 
अशीच सर्वांवर कायम राहू दे
राग द्वेष मनातला 
सर्वांच्या नाहीसा होऊ दे

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 
हे वाक्य तुझं देवा मनाला भावनारं आहे
तुझं नि माझं नातं तेव्हा असच 
अजूनच घट्ट होणार आहे


नातं तुझं नि माझं

नातं आहे तुझं नि माझं 
साता पलिकडचं 
खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं 
सुसाट सुटलेल्या वाऱ्यासारखं
नभात गरजलेल्या ढगा सारखं
पानांवर चिकटलेल्या दवबिंदू सारखं
तुझं नि माझं नातं असच असावं
झाडावर बसलेल्या फुलपाखरासारखं


Tuesday, November 8, 2022

तूच तू

गीत तू सुर तू
त्यातील शब्द मी व्हावे
लय तू कंठ तू
त्यातील तार मी छेडावे

धरती तू अंबर तू
त्यातील चांदणं मी व्हावे
समुद्र तू नदी तू
त्यात मिलन आपले व्हावे

भास तू आभास तू 
त्यातील सावली मी व्हावे
रात्र तू निद्रा ही तूच
त्यातील स्वप्न मी व्हावे

झाड तू माती तू
त्यातील पाणी मी व्हावे
गंध तू सुगंध तू
त्यातील फुल मी व्हावे


माझी लेखणी

आज उतरावं तू लेखणीत माझ्या
अन् सामावून जावं मनअंतरी माझ्या
कोरावं मी तुला या कोऱ्या कागदावर
अन् तू बघत राहावं डोळ्यात माझ्या

आज बेधुंद व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् उधळून टाकावं स्वतःला हृदयी माझ्या
लिहावं मी तुला त्या पिंपळाच्या पानावर
अन् तू न्याहाळत राहावं स्पंदनांना  माझ्या

आज बेभान व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् बरसून टाकावं स्वतःला काळजावर माझ्या
मांडावं मी तुला या फुलांच्या पाकळीवर
अन् तू निरखून पाहावं गुलाबी ओठांना माझ्या

आज वाहून जावं लेखणीने ही माझ्या
अन् आभाळासारखं दाटून यावं मनात माझ्या
सावरावं मी तुला या माझ्या तळ हातावर
अन् तू निभवावं  ते नातं आपलं आयुष्यावर माझ्या


शब्द मी गीत तू

लेखणीतून उतरलेले 
शब्द होऊन येईल मी 
सप्तसुरांनी भरलेलं 
गीत तू होऊन येशील का
अंतकरणातून आलेले
शब्द होऊन येईल मी
तू कोकीळेने गायलेले 
गीत होऊन येशील का
कवितेच्या ओळीतील
शब्द होऊन येईल मी
तू मी लिहिलेल्या गीतातील
बोल होऊन येशील का
तूझ्या मुखातून आलेले 
शब्द होऊन येईल मी
तू माझ्या मुखातून आलेले 
गीत होऊन येशील का

Sunday, November 6, 2022

motivational poem... पंख



ओढेल पाय मागे कुणी
असेल एकटा जरी मी
छाटले जरी पंख कुणी
देईल झुंज त्यास मी....

हिणवले जरी विचार माझे
बळ त्यास देईल मी
लाख विरोधक असले जरी माझे
लढण्याची ताकद ठेवील मी

जरी टाकले वाळीत मला
तरी समतेचा लढा देईल मी
जरी केले धर्मबाह्य मला
तरी बंधुत्वाचा मार्ग दावेल मी


Saturday, November 5, 2022

साथ असावी बुद्धांची

साथ बुद्धांची
आयुष्यभर मिळावी
कृपा असावी

विचार त्यांचे
जन समुदाय ते
धर्म रक्षिते

गौतम बौद्ध
होते विचारवंत
केले ते सिद्ध

गुरू आमचे
सिद्धार्थ नाव त्यांचे
कोटी प्रणाम


Friday, November 4, 2022

साथ तुझी हवी मला

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
साथ तुझी हवी मला
शेवटच्या श्वासापर्यंत

सांगड घालू जीवनाला
दोघांच्या स्पंदनांपर्यंत...

साथ तुझी हवी मला
या जीवनाच्या वाटेवर

हात तुझा हातात घेईल
आशेच्या हिंदोळ्यावर

साथ तुझी मला हवी 
आयुष्यभरासाठी

घेईल मी श्वास 
फक्त तुझ्यासाठी 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


साथ तू देशील ना

या आयुष्याच्या वाटेवर 
कधी पडलोच मी एकटा
तर तू साथ मला देशील ना
कधी रूतलाच माझ्या पायी काटा
तर तुझ्या मऊ हातानी काटा माझा 
तू काढशील ना
डगमगलोच मी कधी जीवनात
तर मला सावरण्यासाठी 
हात तुझा मला देशील ना
आयुष्यभर सहवास तुझा हवा आहे
त्यासाठी साथ तू मला देशील ना...

कधी कधी चालावं तू माझ्यासोबत
हळुवार वाहणाऱ्या पाण्यासारखं 
निरव शांततेत झोपलेल्या पक्ष्यासारख 
असच ठेवेल मी तुला आयुष्यभर अलगद
नाही देणार ते दुःख पायी मोडलेल्या काट्यासारखं 
इच्छा आहे माझी तू अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ मला द्यावी.....
जपेल तुला मी असच नवजात जन्मलेल्या पिल्लासारखं....


स्वप्ने ही चालून यावी

उगवत्या पहाटे पडावी सूर्याची किरणे 
तशी चालून आली दरात माझ्या 
रंगवलेली माझी आयुष्याची स्वप्ने
नवी दिशा नवी आशा 
जाऊ उंच उंच गगने
उगवत्या पहाटे पडावी सूर्याची किरणे
ते सुवर्ण क्षण चालून यावे अंगणी माझ्या
निरखून पाहावं त्या क्षणानी ही स्वप्नांना माझ्या


Thursday, November 3, 2022

साथ फक्त स्वामींची


विसावलेल्या क्षणांना साथ
जणू स्वप्नांची मिळावी
आयुष्याच्या वळणावर साथ
समर्था फक्त तुझीच असावी
मोकळ्या होतील सर्व वाटा
दुभंगलेल्या आयुष्याच्या
या पामरावर कृपा समर्था
फक्त तुझीच असावी....
अश्यक्यालाही शक्य करुनी
दाखविले तू या लेकराला
विश्वास दृढ झाला मनाचा
आयुष्यभर तुझ्या चरणाशी
राहू दे या पामराला....
या उघड्या छपरावर सावली
समर्था फक्त तुझीच असावी
या चालून आलेल्या स्वप्नाला
साथ ही समर्था फक्त तूच द्यावी....


Wednesday, November 2, 2022

अधीर मन माझे

अधीर मन माझे वाऱ्यावर झुलते
तू असता समोरी मन माझं 
फुलासारखं फुलते
🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸
अधीर मन माझं वाऱ्यावर झुलते
स्पर्श तुझा होताच तनामनात
रोमांच शहारते
🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸
अधीर मन माझं वाऱ्यावर झुलते
तू डोळ्यात माझ्या बघताच
मनात काहूर माजते 
🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸
अधीर मन माझं वाऱ्यावर झुलते
तू हात माझा हातात घेताच
स्वप्न मी आयुष्याचे रंगवते
🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸


अधीर मन माझे....स्वामींना अर्पण

हे अधीर मन माझे
स्वामी तुमच्या चरणी अर्पण
भक्तीत तुमच्या लिन होऊन 
मनावर कसलच राहत नाही दर्पण

हे अधीर मन माझे
स्वामी तुमच्या भक्तीत न्हाले
तुम्हीच आमचा पाठीराखा
मी धन्य धन्य झाले

हे अधीर मन माझे 
स्वामी तुमच्याच सेवेत राहील
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हा मंत्र कायम माझ्या अंतकरणात राहील


Tuesday, November 1, 2022

काळोख

अंधारल्या दिशा 
काळोख दाटला
गडदली रात
वणवा हा पेटला 
अन् सुखाच्या वाटेवर
दुःख आले सोबतीला


आठवणींच पुस्तक

खूप ठेवल्याय जपून
तुझ्या मी आठवणी
जमा झाल्यात सर्व 
दुःखाच्या साठवणी

आठवण तुझी येता
काढते मी पुस्तक
पुन्हा परत येण्याची 
तुझी देतात त्या दस्तक

आपल्या मैत्रीच्या पुस्तकात
फक्त तुलाच मी लिहिलंय
सुख दुःखाच्या आठवणी
काळजाच्या शाईने कोरलय


समर्थ असतात सोबतीला

जेव्हा जेव्हा माझ्या
दुःख असते सोबतीला
तेव्हा तेव्हा समर्था माझ्या 
तुम्हीच असतात संगतीला


दुःख झाले सोबती

सुखाच्या वाटेने आता 
येणं च बंद केलंय
दुःख झाले सोबती
आयुष्यात हेच आता उरलयं

आठवणींच  तुझ्या 
मनात काहूर माजलंय
दुःखाच्या वाटांनी
हात माझा धरलाय

डोळ्यातही माझ्या आता
फक्त अश्रूच उरलेय
दुःखाची ही मी आता 
सोबत धरलीय 


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...