नजरेत बघावे मी तुझ्या
रात्र ही उलटून जावी बघताच मी हरवून जावे
कळतील मज भावना तुझ्या
असेही एकदा व्हावे
छेडीले मनास तू माझ्या
नजरेस नजर तुझी भिडावी
स्तब्ध व्हाव्यात डोळ्यातील भावना
असेही एकदा व्हावे
स्वप्ने ही बहरून यावे
असावी मी सोबत तुझ्या
असेही एकदा व्हावे
गंध चाफ्याचा दरवळावा
फुले ही उमलून यावे
प्रितीत फुलावी मी ही तुझ्या
असेही एकदा व्हावे
जीव ही वेडापिसा व्हावा
मन ही गहिवरून यावे
स्पर्श ही प्रेमाचा व्हावा कुशीत तुझ्या
असेही एकदा व्हावे
निशा ही सांगून यावी
निद्रा ही उडून जावी
मीच असावी हृदयात तुझ्या
असेही एकदा व्हावे
तुझी चाहूल वाटावी
स्वप्न ही रंगून यावे
ओठ ही निशब्द व्हावे प्रेमात तुझ्या
असेही एकदा व्हावे
श्वास हि तुझाच व्हावा
स्पंदने ही सांगून जावे
मीच असावे काळजात तुझ्या
असेही एकदा व्हावे
प्रीत ही अशी फुलावी
मने ही खुलून यावे
मिठीत असावी मीच तुझ्या
असेही एकदा व्हावे
पावसाची सर ही यावी
दोघं ही चिंब चिंब भिजावे
हरवून जावे डोळ्यात बघताच मी तुझ्या
असेही एकदा व्हावे
वेल ही झाडावरची अलगद झुलावी
समुद्रातील लाटेनेही स्तब्ध व्हावे
असे स्वप्न बघावे सोबत मी तुझ्या
असेही एकदा व्हावे
प्राजक्ताची कळी ही फुलावी
चाफ्याची फुले ही उमलावे
गंध तो सुटावा प्रेमाचा तुझ्या
असेही एकदा व्हावे
दोन चाकरिने संसार चालावा
आयुष्यात तूही माझ्या रंग भरावे
हे क्षण ही जगावे मी आयुष्यात तुझ्या
असेही एकदा व्हावे
आहेस तु कुणाच्या कुशीत
ते प्रेम तुझी मला का न मिळावे
राहायचे होते हृदयात तुझ्या
असेही एकदा का न व्हावे
सोबत राहायचे आपण दोघे
कदाचित देवालाही हे मान्य नसावे
म्हणून ती यावी जीवनात तुझ्या
असे आपणास का न कळावे
का असावे दूर आपण
देवाने ही दूर का ठेवावे
नशिबाच्या खेळात हरलो आपण दोघे
असेही आयुष्यात कधीच न व्हावे
No comments:
Post a Comment