Saturday, June 26, 2021

असह्य हा एकटेपणा

पानांवर चे दवबिंदू जसे  

मोजक्या क्षणाचे सोबती 

असतात....

तशीच असते काहीशी

काही व्यक्तींची ओळख

म्हटलं तर काही वेळेचा

सहवास असतो....

नंतर नशिबी येतो...

असह्य हा एकटेपणा...

पण तो सहवास दवबिंदू 

सारखाच पानांवर चिकटून 

राहण्याचा भास असतो

आणि निरोपाचा क्षण 

देखील तसाच असतो

जणू दवबिंदू पानावरून

ओघळून जातात

आणि आपण आपली 

ओलसर ओळख मात्र 

जपत राहतो......

आणि पुन्हा एकत्र 

येण्यासाठी एका 

नव्या पहाटेची वाट पाहतो.....

पण शेवटी 

असह्य हा एकटेपणा 

राहिलेला असतो......

Sapna patil ✍️ स्वप्न

Friday, June 25, 2021

तुला लिहिलंय मी...

 डोळे मिटून पाहताना

तुझे प्रतिबिंब पाहिले मी

अंतर्मनात डोकावताना 

तुलाच शोधले मी

तुझ्याविना राहू कशी मी

माझ्या डोळ्यात तर 

तुझेच प्रतिबिंब आहे

माझ्या अंतर्मनात 

डोकावून तर बघ

त्यात पण तुलाच रेखाटलं य मी

तू नाही आहेस माझ्या आयुष्यात 

तरी पण तुला पाहते मी

माझ्या अंतर्मनात पण तुलाच कोर

तुला माझ्या डोळ्यात पाहून

मन भरून येत माझं

म्हणून माझ्या कवितेत

तुला व्यक्त केलय मी

माझ्या अंतर्मनात डोकावून तर बघ

त्यात पण तुलाच लिहिलय मी

तुझ्या सोबतचा एक एक 

क्षण खूप जपलाय मी

माझ्या अंतर्मनात पण

तुझ्या आठवणींना कोरून ठेवलंय मी...

Sapna patil

सहजचि सारे घडले...

 कधी न आलेले शब्द 

ओठांवर येऊन गेले

तुझ्यामुळेच हे सहजच 

सारे घडून गेले...

तुझ्या शब्दांचे खेळ सारे रंगले

त्या शब्दांच्या धुंदीत 

मित कवितांमध्ये दंगले...

असे हे सहजच सारे घडले

तुझे शब्द माझे शब्द 

सारे एकीत गुंतले

या स्मित शब्दांना मी 

कवितेत मांडले

तुझ्यामुळेच हे 

सहजच सारे घडले

तुझ्या भावना माझ्या भावना

कोऱ्या कागदावर

मांडायला शिकले

तू होतास म्हणून हे 

सहजच सारे घडले

सहजच सारे घडले....

Sapna patil ✍️💞 न

शब्द शोधते तुला भेटण्यासाठी

 


मनात खूप काही लपलेले होते...

पण स्वतःला कधी मांडलेच नव्हते...

मग मी स्वतःला शब्दांच्या रुपात मांडत गेले...

फक्त त्याने मला वाचण्यासाठी....

त्याला भेटण्याची ओढ खूप होती...

म्हणून शब्दातून का होईना...

शब्द शब्द जुळवत गेले

फक्त त्याने मला भेटण्यासाठी...

शब्दाशब्दांची जुळवणी करून 

मी होऊन कविता त्याच्यापर्यंत जाईल..

त्याने वाचता वाचता कविता

मी शब्दातून त्याला पाहिलं

त्याने वाचून मला कवितेच्या रुपात

तुझ्या निरागस चेहऱ्यावर स्मित 

हास्य होऊन मी उमटून राहील...

मी लिहिलेलं त्याने आवरजुन वाचावं

म्हणून मी तुझ्यासाठी आवरजून लिहावं

मी लिहिलेल्या शब्दांमध्ये त्याने कविताला शोधावं

आणि तो मलाच शोधत आहे अस मला वाचावं...

म्हणून शब्द शोधत असते तुला भेटण्यासाठी

शब्द शब्द जुळवत असते फक्त त्याने मला शोधण्यासाठी...

Sapna patil ✍️..

पाऊस....



आज खूप दिवसांनी नभ दाटून आले होते....

आभाळ भरून आलं होत....

जणू त्याला काहीतरी वेगळच सांगायचं होत... 

पण शब्दात न सांगता बरसून गेला तो पाऊस....

आज त्याला काहीतरी सांगायचे होते

पण काहीही न सांगताच 

काहीतरी लपवत वाहून गेला तो पाऊस....

मनातील हुंदके फुटत...

आभाळ गर्जून...काळ्याभोर नभात

लखलखत्या चांदणी ल लपवून गेला तो पाऊस...

आज कदाचित त्याला पूर्ण मोकळं व्हायचं होत...

पण काहीच न दाखवता 

ओलेचिंब होऊन...

डोळ्यातील सुनामी लपवत... 

अंधारलेल्या नभात मोकळा होऊन गेला तो पाऊस....

आज पुन्हा त्याला काहीतरी दाखवायचे होते...

पुन्हा तो मनसोक्त बरसून 

सांजवेळी त्या विरहात....

मनातील एकवटलेल्या थेंबात...

दुभंगलेल्या डोळ्यात पुन्हा ओसंडून गेला तो पाऊस....

Sapna patil...✍✍



Thursday, June 24, 2021

आयुष्याची परीक्षा....



एकदा मी जळगांवला गेले असता तिथल्या बसस्टॉप वर एक छोटासा मुलगा फुगे विकत होता.त्याच्यासोबत त्याची छोटीशी एक लहान बहीण पण होती. त्या दोघांनी फाटलेले कपडे घातलेले होते.केस इकडे तिकडे झालेले होते.त्यांना बघून अस वाटत होत त्यांना खूप भूक लागली असावी.त्या पो टाच्या भुकेसाठी कदाचित त्यांना फुगे विकावे लागत होते.पण ते दोघं फक्त फुगेच विकत नव्हते . त्या फुग्याना फुगवून म्हणजे त्यात हवा भरून  विकत होते.त्याच्या कडे बघून एक लक्षात आले की ते फुगे फुगवून किंवा त्यात हवा भरून नाही विकत आहेत. तर ते त्या फुग्यांमध्ये त्याचा श्वास भरून विकत आहेत.फक्त पोट भरण्यासाठी. कसं असत ना हे आयुष्य .कुणाला किती दुःख तर कुणाला किती सुख देते. ते दुःख जणू काही आपली परीक्षाच घेत असते.ती त्याची परिस्थिती त्याच्या आयुष्याची परीक्षाच घेत होती.तर यावरून हे लक्षात येते की त्यांच्यापेक्षा आपण किती सुखात आहोत. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं असते.पण त्यांना समोर जाण्याचं धाडस आपण केलं पाहिजे . कारण या जगात कोणतीच गोष्ट ही कायम स्वरुपी टिकून राहत नाही.आपल दुःख सुद्धा. एक जोकर लोकांना हसविण्यासाठी एक गोष्ट सांगतो. लोक खूप हसतात.पण तो जोकर परत तीच गोष्ट पुन्हा सांगतो.तर लोक थोडे कमी हसतात.अजून तो जोकर तीच गोष्ट परत सांगतो.तर लोक हसतच नाही.तेव्हा तो जोकर त्या लोकांना सांगतो.तुम्ही एकाच आनंदाला घेऊन वेळोवेळी आनंद घेऊन नाही हसू शकत तर तुम्ही एकच दुःख घेवून वेळोवेळी का रडतात.खरतर आयुष्य हे आपली परीक्षाच घेत असते.पण आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असते.ना की नापास.आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्या दुःखाला सुद्धा आपल म्हणून जगायचं असते. कारण असच आयुष्य असते.आणि हीच आपल्या आयुष्याची परीक्षा असते....

Sapna patil.... ✍️✍️

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...