एकदा मी जळगांवला गेले असता तिथल्या बसस्टॉप वर एक छोटासा मुलगा फुगे विकत होता.त्याच्यासोबत त्याची छोटीशी एक लहान बहीण पण होती. त्या दोघांनी फाटलेले कपडे घातलेले होते.केस इकडे तिकडे झालेले होते.त्यांना बघून अस वाटत होत त्यांना खूप भूक लागली असावी.त्या पो टाच्या भुकेसाठी कदाचित त्यांना फुगे विकावे लागत होते.पण ते दोघं फक्त फुगेच विकत नव्हते . त्या फुग्याना फुगवून म्हणजे त्यात हवा भरून विकत होते.त्याच्या कडे बघून एक लक्षात आले की ते फुगे फुगवून किंवा त्यात हवा भरून नाही विकत आहेत. तर ते त्या फुग्यांमध्ये त्याचा श्वास भरून विकत आहेत.फक्त पोट भरण्यासाठी. कसं असत ना हे आयुष्य .कुणाला किती दुःख तर कुणाला किती सुख देते. ते दुःख जणू काही आपली परीक्षाच घेत असते.ती त्याची परिस्थिती त्याच्या आयुष्याची परीक्षाच घेत होती.तर यावरून हे लक्षात येते की त्यांच्यापेक्षा आपण किती सुखात आहोत. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं असते.पण त्यांना समोर जाण्याचं धाडस आपण केलं पाहिजे . कारण या जगात कोणतीच गोष्ट ही कायम स्वरुपी टिकून राहत नाही.आपल दुःख सुद्धा. एक जोकर लोकांना हसविण्यासाठी एक गोष्ट सांगतो. लोक खूप हसतात.पण तो जोकर परत तीच गोष्ट पुन्हा सांगतो.तर लोक थोडे कमी हसतात.अजून तो जोकर तीच गोष्ट परत सांगतो.तर लोक हसतच नाही.तेव्हा तो जोकर त्या लोकांना सांगतो.तुम्ही एकाच आनंदाला घेऊन वेळोवेळी आनंद घेऊन नाही हसू शकत तर तुम्ही एकच दुःख घेवून वेळोवेळी का रडतात.खरतर आयुष्य हे आपली परीक्षाच घेत असते.पण आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असते.ना की नापास.आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्या दुःखाला सुद्धा आपल म्हणून जगायचं असते. कारण असच आयुष्य असते.आणि हीच आपल्या आयुष्याची परीक्षा असते....
Sapna patil.... ✍️✍️
खूपच सुंदर लेखन
ReplyDeleteखुपच सुंदर... आणि संवेदनशील पध्दतीने व्यक्त केलं आहे...
ReplyDeletekhup chhan👌👌👌
ReplyDelete