मनात खूप काही लपलेले होते...
पण स्वतःला कधी मांडलेच नव्हते...
मग मी स्वतःला शब्दांच्या रुपात मांडत गेले...
फक्त त्याने मला वाचण्यासाठी....
त्याला भेटण्याची ओढ खूप होती...
म्हणून शब्दातून का होईना...
शब्द शब्द जुळवत गेले
फक्त त्याने मला भेटण्यासाठी...
शब्दाशब्दांची जुळवणी करून
मी होऊन कविता त्याच्यापर्यंत जाईल..
त्याने वाचता वाचता कविता
मी शब्दातून त्याला पाहिलं
त्याने वाचून मला कवितेच्या रुपात
तुझ्या निरागस चेहऱ्यावर स्मित
हास्य होऊन मी उमटून राहील...
मी लिहिलेलं त्याने आवरजुन वाचावं
म्हणून मी तुझ्यासाठी आवरजून लिहावं
मी लिहिलेल्या शब्दांमध्ये त्याने कविताला शोधावं
आणि तो मलाच शोधत आहे अस मला वाचावं...
म्हणून शब्द शोधत असते तुला भेटण्यासाठी
शब्द शब्द जुळवत असते फक्त त्याने मला शोधण्यासाठी...
Sapna patil ✍️..
तोच शब्द म्हणून आला तर? हा माझा प्रतिप्रश्न👌👌💐💐💐
ReplyDeleteThanks mam 🙏🏻
Deleteशब्द... सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteशुभ प्रभात मॅडम !🙏
विरह भावनांचे उत्तम शब्दांकन... अप्रतिम रचना
ReplyDeleteThanks 🙏
Deletesundar 👌👌👌
ReplyDelete