Saturday, July 9, 2022
पांडुरंग ( अभंग )
Wednesday, July 6, 2022
तिचे हक्क
बलात्कार
अंतर
Sunday, July 3, 2022
पेरलेलं दाणं
Tuesday, June 28, 2022
पाऊस...
आज बेभान होऊन बरसत होता तो
मी फक्त एक टक लावून बघत होते त्याला
काहीतरी सांगावेसे वाटत होते त्याला
पण त्याच्या अशा बरण्यानेच मला
सर्व काही कळत होते तो अबोल असताना
त्याच्या डोळ्यातून त्या वाहणाऱ्या धारा
मला अचंबित करत होत्या
आज तो मला खूप एकवटलेला दिसत होता
कदाचित मला तो माझी साथ मागत असेल
असेच मला जाणवत होते
झाडाच्या आडोशाला उभी होते मी
अन् तो मला त्याच्याकडे येण्याची ओढ लावत होता
का माहित नाही पण मला पण त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.....
मला त्याचा होणारा स्पर्श मोहरुन टाकत होता
मी चिंब चिंब भिजत होते
त्याच्या कुशीत बेधुंद होऊन
विजेचा कडकडाट होत होता
मी बेभान होऊन त्याच्यात सामावले
एवढी सामावले की माझे मलाच भान न राहिले
अन् घेऊन गेला तो मला स्वप्नांच्या दुनियेत....
.
.
.
जणू सामावला माझ्यात तो छंद प्रीतीचा....
चौफेर पसरला तो सुगंध प्राजक्ताचा.....
मदमस्त करुनी गेला तो गंध त्या ओल्या मातीचा....
आज बेभान होऊन बरसला तो पाऊस माझ्यावर
अन् होऊन गेला तो माझ्या मनाचा.....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
Saturday, June 25, 2022
पावसाची सर
खिडकी
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
-
देशासाठी लढेल देशासाठी मरेल लहानपणापासूनच मनात हौस होती लढता लढता देश जिंकेल हीच मनात लागलेली आस होती.... जबाबदारी ...
-
तुझं ते हक्कान माझ्यावर रुसण खूप आवडत मला मी तुझ्यात गुंतत जाते मग तूच सावरतोस मला...😘 तुझं ते हक्काने माझ्यावर रागावणं आणि तुझं रागात ...
-
दुष्काळ पडला व्हता जव्हा तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं.... भुकेल व्हतं लेकरू मह्य तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं पडत व्हते माह्या डोयातले...