आज बेभान होऊन बरसत होता तो
मी फक्त एक टक लावून बघत होते त्याला
काहीतरी सांगावेसे वाटत होते त्याला
पण त्याच्या अशा बरण्यानेच मला
सर्व काही कळत होते तो अबोल असताना
त्याच्या डोळ्यातून त्या वाहणाऱ्या धारा
मला अचंबित करत होत्या
आज तो मला खूप एकवटलेला दिसत होता
कदाचित मला तो माझी साथ मागत असेल
असेच मला जाणवत होते
झाडाच्या आडोशाला उभी होते मी
अन् तो मला त्याच्याकडे येण्याची ओढ लावत होता
का माहित नाही पण मला पण त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.....
मला त्याचा होणारा स्पर्श मोहरुन टाकत होता
मी चिंब चिंब भिजत होते
त्याच्या कुशीत बेधुंद होऊन
विजेचा कडकडाट होत होता
मी बेभान होऊन त्याच्यात सामावले
एवढी सामावले की माझे मलाच भान न राहिले
अन् घेऊन गेला तो मला स्वप्नांच्या दुनियेत....
.
.
.
जणू सामावला माझ्यात तो छंद प्रीतीचा....
चौफेर पसरला तो सुगंध प्राजक्ताचा.....
मदमस्त करुनी गेला तो गंध त्या ओल्या मातीचा....
आज बेभान होऊन बरसला तो पाऊस माझ्यावर
अन् होऊन गेला तो माझ्या मनाचा.....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment